Talegaon Dabhade News : 17 मे पासून तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे क्रीडा संकुल इमारतीतून प्रशासकीय कामकाज

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे नगरपरिषदेची इमारत जीर्ण झाली असून तिथे नवीन प्रशासकीय इमारत बांधण्यात येणार आहे. त्यामुळे तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या इमारतीत चालणारे दैनंदिन प्रशासकीय कामकाज 17 मे (मंगळवार) पासून कै. पै. विश्वनाथ भेगडे क्रीडा संकुल, मारुती मंदिर चौक, तळेगाव दाभाडे या ठिकाणावरून होणार आहे. अशी माहिती मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांनी दिली. 

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे सद्यस्थितीत सुरू असलेले दैनंदिन प्रशासकीय कामकाज हे नगरपरिषद मालकीच्या सि. स. क्र.4751 येथील जुन्या इमारतीमध्ये सन 31/10/1976 पासून सुरू आहे. सध्याची जुनी प्रशासकीय ही जीर्ण झालेली असल्याने सदर ठिकाणी नवीन प्रशासकीय इमारत बांधणेबाबत धोरणात्मक निर्णय तसेच जुनी प्रशासकीय इमारत पाडण्यासाठी व  नगरपरिषदेच्या कै. पै. विश्वनाथ भेगडे क्रीडा  संकुल  याठिकाणी स्थलांतरित करणेबाबत  मान्यता नगरपरिषद सर्वसाधारण ठराव क्र 9/2 दि. 14/10/2021 व दि 22/04/2022 च्या ठराव क्र. 1 अन्वये मान्यता प्राप्त झालेली आहे.

याप्रमाणे नगरपरिषदेचे सर्व दस्तऐवज, फाईल्स ,रेकॉर्ड रुम मधील नस्ती, अभिलेखे व इतर अनुषंगिक साहित्य हे दि. 9 मे 2022 पासून कै. पै. विश्वनाथ भेगडे क्रीडा  संकुल  याठिकाणी स्थलांतरित करणेची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे.

मंगळवार (दि 17 मे) पासून तळेगाव दाभाडे  नगरपरिषदेचे दैनंदिन प्रशासकीय कामकाज हे कै. पै. विश्वनाथ भेगडे क्रीडा  संकुल, मारुती मंदिर चौक , तळेगाव दाभाडे याठिकाणावरून सुरू राहील अशी  माहिती मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.