Maratha Reservation : एसईबीसी वर्गातील मराठा विद्यार्थांना खुल्या वर्गातून प्रवेश 

एमपीसी न्यूज – मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्याने रखडलेले सर्व शैक्षणिक प्रवेश सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.  एसईबीसी प्रवर्गासाठी आरक्षण न ठेवता शैक्षणिक संस्थांमधील प्रवेश करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. 9 सप्टेंबर 2020 नंतरचे सर्व प्रवेश ईएसबीसी वर्गासाठी आरक्षण न ठेवता करण्याचा निर्णय राज्य सरकारच्या वतीनं घेण्यात आला आहे.

राज्य सरकारने जारी केलेल्या शासन निर्णयानुसार, एसईबीसी प्रवर्गासाठी आरक्षण आता न ठेवता शैक्षणिक संस्थांमधील प्रवेश सरसकट सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे आता खुल्या प्रवर्गातून विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यावे लागणार आहेत. 9 सप्टेंबर 2020 नंतर  ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी अर्ज केले होतो, मात्र त्यांना प्रवेश मिळालेले नव्हते. त्यांना आता खुल्या प्रवर्गातून प्रवेश देण्यात येणार आहेत. तसेच हे सर्व प्रवेश मराठा आरक्षण उठवण्यासाठी राज्य सरकारने दाखल केलेल्या याचिकेच्या अधीन असणार आहेत.

मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाली  होती. त्यानंतर मराठा आरक्षणचा प्रश्न जोपर्यंत मार्गी लागत नाही, तोपर्यंत प्रवेश प्रक्रिया सुरु करु नये अशी मागणी, मराठा वर्गाकडून करण्यात आली होती. त्यानंतर आता मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्याने रखडलेले सर्व शैक्षणिक प्रवेश सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.