Pune News : विद्यापीठात सायकलस्वारांना प्रवेश द्या; इंडो ॲथलेटिक्सचे सायकलसह आंदोलन

एमपीसी न्यूज – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारात सायकलला प्रवेश देण्यात यावा. सायकलस्वारांनावरील बंदी उठवावी, या मागणीसाठी इंडो ॲथलेटिक्स सोसायटीतर्फे शनिवारी विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर सायकलसह आंदोलन करण्यात आले.

विद्यापीठाने सायकल प्रवेश बंदीचा निर्णय लवकरात – लवकर हा निर्णय मागे घ्यावा आणि सायकलस्वारांवर घातलेली बंदी उठवावी असे निवेदन इंडो ॲथलेटिक्स सोसायटीतर्फे कुलगुरूंना देण्यात आले. आंदोलनाचे नेतृत्व गिरीराज उमरीकर, श्रेयस पाटील यांनी केले. गिरीश परदेशी, सुनील चाको, रमेश माने, बाळासाहेब कांबळे, अजित गोरे, संदीप परदेशी, अमीर शेख, अमीन शेख, उमा डोंगरे, सुरेश माने, सुहास पवार, युवराज पाटील आदींनी आंदोलनाच्या संयोजनामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली.

काही दिवसापासून पुणे विद्यापीठात इतर सर्व वाहनांना प्रवेश मुक्तपणे दिला जात होता. परंतु सायकलस्वरांना आत मध्ये येण्यास बंदी घालण्यात आली. यासंदर्भात बऱ्याच जणांनी संस्थेकडे तक्रार केली होती. विद्यापीठामध्ये वातावरण चांगले असल्यामुळे बरेच जण सायकलवर येथे सकाळी व्यायाम करण्यासाठी येतात. पण, सायकलस्वारांना येण्यासाठी बंदी घातली.  दिवसभर देखील विद्यापीठांमध्ये इतर वाहनांची वर्दळ असते. परंतु, सायकल वर येण्याला येथे बंदी घालण्यात आली असे संस्थेचे सदस्य गजानन खैरे यांनी सांगितले.

विविध कंपन्यांमध्ये त्याचप्रमाणे देशातील विविध आयआयटी व आयआयएमच्या कॅम्पस मध्ये फक्त सायकलला प्रवेश आहे. इतर वाहनांना बंदी आहे. परंतु पुणे विद्यापीठाच्या या निर्णयाविरोधात सायकल संघटनांमध्ये संतापाची लाट असल्याचे  संस्थेचे अजित पाटील म्हणाले.

एकेकाळी पुणे हे सायकलिंगचे शहर होते, आता ती वैभव प्राप्त करून देण्यासाठी संघटना देशामध्ये कार्यरत आहेत. परंतु विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यामधील महत्त्वाच्या विद्यापीठाकडून अशा निर्णयाची अपेक्षा नाही, असे उमा डोंगरे म्हणाल्या.

पुण्याची स्मार्ट सिटीकडे वाटचाल होत असताना विद्यापीठांमध्ये देखील सायकल ट्रॅक्स झाले पाहिजेत. त्यासाठी जे काही मार्गदर्शन लागेल ते संस्था करेल असे देखील यावेळी सांगण्यात आले.

विद्यापीठाने लवकरात सायकलस्वारांना घातलेली बंदी उठवावी असे निवेदन इंडो ॲथलेटिक्स सोसायटीतर्फे कुलगुरूंना देण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.