Adv Prakash Ambedkar : मुस्लिम संघटनांवरील धाडीचे तपशील सामान्य लोकांसमोर मांडा

एमपीसी न्यूज : केंद्रीय तपास यंत्रणांनी गुरुवारी संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशभरात विविध ठिकाणी मुस्लिम संघटनांवर धाडी टाकल्या. तपास यंत्रणांचा धाडी टाकण्याचा त्यांचा अधिकार आम्ही मान्य करतो. परंतु,या धाडी का टाकल्या? यांच्याविरोधात काय पुरावे होते? आणि जे कागदपत्र गोळा केलेले आहेत, त्यात किती निधी मिळाला? देशविरोधी कारवायांचे किती कागदपत्रे मिळाले? हे या तपास यंत्रणांनी येत्या 24 तासात लोकांसमोर मांडावं. असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर (Adv Prakash Ambedkar) यांनी केले आहे.

ऍड आंबेडकर (Adv Prakash Ambedkar) म्हणाले, तपास यंत्रणांना 24 तासात हे मांडता आलं नाही, तर सामान्य माणूस हेच लक्षात घेईल की, भाजपचा जो मुस्लिम विरोधी अजेंडा आहे, तो पुढे करण्याकरिताच या धाडी टाकण्यात आल्या आहेत. असे असेल तर वंचित बहुजन आघाडी या धाडींचा निषेध करते. असेही त्यांनी म्हटले आहे.

एनआयए या केंद्रीय तपास यंत्रणेने गुरुवारी महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, तेलंगणा, केरळ, कर्नाटक, तामिळनाडू या राज्यात एकाच वेळी छापेमारी केली. दहशतवाद्यांना निधी पुरवणे, देश विघातक कृत्य करणे, प्रशिक्षण शिबिरे आयोजित करणे, बंदी घातलेल्या संघटनेमध्ये लोकांना जाण्यासाठी प्रोत्साहन देणे अशा विविध कारणाखाली पीआयएफच्या शंभरहून अधिक सदस्यांना अटक करण्यात आली आहे.

Sushma Andhare : नारायण राणेंचे मानसिक संतुलन ढासळले – सुषमा अंधारे

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.