Good Health Tips : वर्क फ्रॉम होम आणि मणके

एमपीसी न्यूज –  कोविडमुळे जगाची सगळी कशी उलथा पालथ झाली. कितीही प्रगत असला तरीही एका काही नॅनोग्रमच्या व्हायरसने पूर्ण जगाला वेठीला धरले. नवनवीन बातम्या आणि सुरुवातीचा जास्त असलेला मृत्यूदर, नसलेले रामबाण उपचार यामुळे लॉकडाऊन हाच मुख्य उपाय झाला आणि पूर्ण जगातल्या सगळ्या गोष्टी बंद पडल्या. लॉकडाऊन लागल्यावर काही आठवडे महिने असेल त्यामुळे ब-याचशा लोकांना हायसे देखील वाटले, चला सक्तीचा आराम आहे हा…छानच!

मग निघाली ‘WORK FROM HOME’ ची शक्कल. Software कंपन्या सगळ्या Employees ला work from home ची मुभा देऊ लागले. हळू हळू सगळ्याच कंपन्या work from home करू लागले. सुरुवातीला झालेला आनंद आता ओसरू लागला. WFH चे शारिरीक व मानसिक अपाय जाणवायला लागले. WFH / LOCKDOWN / Online School ह्या गोष्टींनी जगाचे खूप मोठे मानसिक व शारीरिक नुकसान झाले. आपला विषय मणक्याविषयी असल्यामुळे इतर गोष्टींची चर्चा व्यर्थ…

दिवस रात्र आपल्या डेस्क टॉप किंवा लॅपटॉप समोर बसणे यामुळे कळत नकळत ब-याच पाठींना बाक आले. मणक्यांची संरचना अशाप्रकारे असते की साधारणत: आडवे झोपल्यावर शून्य टक्के प्रेशर मणक्यावर येते व उभे राहिल्यास 100 टक्के प्रेशर येते. परंतु, सरळ न बसल्यास मणक्यांवर येणारे प्रेशर हे 150 टक्के एवढे जास्त असते. बसताना रिलॅक्स बसण्याच्या नादात असो किंवा आळसामुळे असो मणके काही जास्त प्रमाणात वजन व परिणामी झीज ला सामोरे जातात.

सकाळी घरातच जागे झाल्यावर उठून बाजूच्या खूर्चीत बसून office काम सूरू होते. Office असल्यास तो व्यक्ती कमीत कमी 1 ते दिड जास्त आधी जागा होऊन तयार होऊन Office ला जातो. कारपर्यंत आणि कारपासून असे अंतर चालावेच लागते. ओळखीचे 2/4 चेहरे भेटून त्यांच्याशी उभ्यानेच चर्चा होते आणि मग काम सुरु होते.

अधून मधून थोडे चालणे चहा जेवण व social interaction या गोष्टींमुळे मानसिक शारीरिक ताण जाणवत नाही. परंतू work from home सकाळपासून संध्याकाळपर्यंत एकाच खुर्चीत आणि ते ही वेडे वाकडे बसून दिवस काढणे आणि हो कामाला काही वेळ काळ नाही.

कारण बाहेर लॉकडाऊन, वरिष्टांना माहिती आहे सगळे सदैव उपलब्ध आहेत. शारिरीक श्रम नाही / मानसिक नैराश्य यामुळे वजनही ब-याच व्यक्तींचे वाढले. या सगळ्यात भरडले गेले ते मणके! पाठदुखी हळू हळू वाढायला लागली. बसले की पाठ दुखणे झोपले की बरे वाटणे. हळू हळू हाता पायात दुखणे, मुंग्या येणे असे आजार वाढू लागले. लॉकडाऊन उघडल्यावर work from home मुळे खूप लोकांना मणक्याचे आजार सुरु झाले. ब-याच लोकांना
त्यासाठी surgery पण करून घ्यायला लागली.  आता कसे पुन्हा हळू हळू जीवन परत रूळावर येते आहे, पण असे असले तरीही काळजी ही घ्यायलाच हवी.

काय काळजी घ्यायला हवी – 

  • Work From Home मध्ये खुर्ची सरळ असावी, साधारणत: बसल्यावर Hip आणि knee Joint काटकोनात राहतील एवढी उंची असावी.
  • Desk top or Laptop डोळ्यांच्या लेवलला असले व की पॅड छातीच्या लेवलला असावे.
  • अधून मधून उठून हात पाठ पाठीचे stretelering करावे.
  • नियमित सकाळी / संध्याकाळी व्यायाम करावा.
  • एक दिड तास काम केल्यावर 2/5 मिनीटे उभे राहून चालावे.
  • Office Online नसताना घरातील इतरांशी interact करावे.
  • Multitasking टाळावे.
  • एकाच वेळी office mobile phone आणि जेवण वगैरे असे करू नये, अशा vircumstance मध्येovereating होते व वजनही वाढते.
  • आजूबाजूच्या मित्र मैत्रीणीबरोबर वेळ घालवणे व अधून मधून निसर्गात जाणे.

आर्थिक दृष्टीने ‘work from home’ जरी एक आशीर्वाद वाटत असेल तरी वैयक्तिक आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहे.

अधिक माहितीसाठी : www.spinenbrain.com

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.