Pimpri: फिलट्रेशन प्लांट बसविण्यासाठी सल्लागार 

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील नाल्यांमधील अशुद्ध पाण्यावर अद्यावत फिलट्रेशन प्लांट बसविण्यात येणार आहेत. त्याचा सल्ला घेण्यासाठी पुण्यातील बुस्टर्म इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हेलपमेंट कनस्लटंट यांची नेमणूक करण्यात आली असून त्याला स्थायी समितीने आयत्यावेळी मान्यता दिली. 

पिंपरी-चिंचवड शहरातून इंद्रायणी, पवना आणि मुळा या तीन नद्या वाहत आहेत. शहरातील नाल्यांमधील अशुद्ध पाणी कोणतीही प्रक्रिया न करता नद्यामध्ये जाते. त्यामुळे नद्यांच्या प्रदुषणात वाढ होते. अनेक नाल्यांच्याकडेने भंगाराची दुकाने आहेत. व्यावसायिक ऑईल नाल्यामध्ये सोडतात. नाल्यातील दुषित पाण्यामुळे शहरातील नद्यांचे प्रदुषण वाढत आहे. त्यामुळे महापालिकेतर्फे नाल्यातील अशुद्ध पाण्यावर   अद्यावत फिलट्रेशन प्लांट बसविण्यात येणार आहेत. त्या पाण्यावर प्रक्रिया करुन ते पाणी नद्यांमध्ये सोडले जाणार आहे. त्या कामासाठी बुस्टर्म इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हेलपमेंट कनस्लटंट यांची सल्लागार म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.

तसेच महापालिकेच्या  प्राथमिक शाळेतील पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांना  काळे व पांढरे बुट आणि दोन जोडे मोझे देण्यात येणार आहेत. त्यासाठी येणा-या खर्चाला देखील स्थायी समितीने आयत्यावेळी मान्यता दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.