Vadgaon Maval News : तब्बल 20 वर्षांनी पुन्हा भरला न्यू इंग्लिश स्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा वर्ग

एमपीसी न्यूज (श्याम मालपोटे) : न्यू इंग्लिश स्कूल वडगाव मावळ शाळेतील 2002 सालच्या दहावी  बॅच मधील विद्यार्थ्यांचे स्नेह संमेलन रविवार दि 29 मे 2022 रोजीहॉटेल निसर्ग कान्हे फाटा येथे संपन्न झाले. 20 वर्षानंतर शिक्षक व विध्यार्थी यांची गळाभेट झाल्याने सारेजण भारावून गेले.

दरम्यान स्नेह संमेलनाच्या सुरवातीला सर्व विद्यार्थ्यांची ओळख करून घेण्यात आली. तदनंतर डॉ. प्रियंका गायकवाड, तुषार आवटे, तुकाराम आगळमे, सचिन कांबळे या विध्यार्थ्यानी मनोगत व्यक्त करताना “आम्ही आमच्या आयुष्यात पुढे जाण्यासाठी मोलाचा वाटा हा तुमचा म्हणजेच शिक्षकांचा कसा होता त्या बद्दल भावना व्यक्त केल्या व त्याचे आभार मानले.

स्नेह संमेलनामध्ये प्रामुख्याने बाळासाहेब गायकवाड सर, नेवसे सर, व्ही. जी. पवार सर, ए. आर. पाटील, पासलकर मॅडम, यांनी मनोगत व्यक्त केले व शाळेच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला गेला तसेच असे प्रेम आदर  व आपुलकी फक्त वडगाव मावळ मधील न्यू इंग्लिश मधल्या विद्यार्थ्यांमध्येच पाहायला मिळते अशा भावना  सर्व शिक्षक वृंदानी व्यक्त केली. स्नेह संमेलना बद्दल बोलताना हा सोहळा 20 वर्षांनी आयोजित केला त्या बद्दल 2002 साल बॅचच्या शिक्षकांनी ऋण व्यक्त केले.

कार्यक्रमादरम्यान प्यारेलाल शेख सर यांनी ‘होठों पे सचाई रहती है, जहाँ दिल में सफ़ाई रहती है’ हे गाणे गाऊन शाळेतील जुन्या आठवणी जाग्या केल्या तर. शाम उबाळे सर यांनी ‘या लाडक्या मुलांनो तुम्हीच शिल्पकार’ हे  गाणे म्हणून मंत्र मुग्ध केले.कार्यक्रमाचा शेवट स्नेह संमेलनाचे अध्यक्ष प्रल्हाद देवघरे सरांच्या भाषणाने झाला.

या कार्यक्रमासाठी न्यू इंग्लिश स्कूलमधील 2002 चे गुरुवर्य सन्माननीय प्रल्हाद देवघरे सर यांनी  अध्यक्षपद भूषविले होते. त्याच बरोबर बाळासाहेब गायकवाड सर, शोभा सूर्यवंशी मॅडम,शोभा धुमाळ मॅडम, अशोक बसागरे सर, निवेदिता पासलकर मॅडम, एच.स.नेवसे सर, अनिल कोद्रे सर, देवरामजी पारीठेसर, आयुबजी पिंजारी सर, शामजी उबाळे सर, व्ही.जी.पवार सर, ए.आर.पाटील सर, शामकांत कुलूमकर सर, पाटील मॅडम, शकुंतला ढोरे मॅडम, प्यारेलाल शेखसर,न्यू इंग्लिश स्कूल चे विद्यमान प्राचार्य होळकर सर, उपप्राचार्य गायकवाड सर, वनराज ढोरे कार्यक्रमासाठी उपस्थित झाले होते.

कार्यक्रमाचे सूत्र संचालन गिरीश गुजराणी यांनी केले व नियोजन 2002 च्या बॅचच्या सर्व विध्यार्थ्यानी केले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.