Talegaon : आमदार भेगडेंच्या  प्रयत्नातुन तब्बल 40 वर्षा नंतर त्यांना भेटली स्वत: ची सायकल

एमपीसी  न्यूज – गेल्या अनेक वर्ष त्यांनी आपले आयुष्य पाय नसल्यामुळे फरफटत काढले.रोज आपली उपजीविका करण्यासाठी रेल्वे स्टेशनच्या बाहेर पैसे मागून उदार निर्वांह करत असे. येथे दोन वेळच पोट भरणे कठीण तर व्हिलचेअर कशी घेणार, अशा परिस्थितीत  देहुरोड येथील प्रकाश नेवासे यांच्या मदतीला आमदार बाळा भेगडे आले धावून.

जीवन जगत असताना देहूरोडची स्थानिक कार्यकर्त्यांनी त्यांच्या विषयी आमदारसाहेबांना माहिती दिली. आमदारांनी तात्काळ आदेश देऊन त्या व्यक्तीला व्हिलचेअर देण्यास सांगितले. आणि आरोग्यमित्रांनी देहूरोडच्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधून त्यांना व्हिलचेअर दिली. या वेळी पायोनियर हॉस्पिटल चे डायरेक्टर स्वानंद पारवे व आरोग्य मित्र उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.