BNR-HDR-TOP-Mobile

Talegaon Dabhade : तब्बल साडेपाच तासाच्या आंदोलनानंतर पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग सुरू

944
PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज – मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेले आंदोलन तब्बल साडेपाच तासानंतर अखेर मागे घेण्यात आले असून पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील वाहतूक पुन्हा सुरळीत झाली आहे.

उर्से टोल नाका येथे सकाळपासून सुरु असलेले मराठा आंदोलन अखेर साडेपाच तासानंतर मागे घेण्यात आले आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एका प्रवासी महिलेकडे असलेले लहान मुल प्रचंड रडत असल्याने तिने आंदोलकांसमोर येऊन आक्रोश सुरू केला. अखेल आमदार बाळा भेगडे यांनी मध्यस्थी करून आंदोलन स्थगित करण्यास सांगितले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

 

HB_POST_END_FTR-A4
HB_POST_END_FTR-A1
.