Pune News : पतीसोबत झालेल्या वादातून लहान मुलीसमोरच विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

एमपीसी न्यूज : पुण्याच्या कोथरूड परिसरातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली. पतीसोबत झालेल्या वादातून एका 31 वर्षीय विवाहितेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. मात्र ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप विवाहितेचा नातेवाईकांनी केला. त्यामुळे पोलिसांनी पोस्ट मार्टम राखून ठेवले असल्याचे सांगण्यात आले आहे.

प्रीती दीपक काकडे (वय 31, कोथरुड) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी कोथरुड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, प्रीती व त्यांचे पती कोथरुड येथील भुसारी कॉलनीत राहण्यास आहेत. दीपक हे सॉफ्टवेअर अभियंता आहेत. त्यांना एक पाच वर्षांची मुलगी आहे. प्रीती या गृहिणी आहेत.

दरम्यान त्यांचे घरघुती वाद होते, असे सूत्रांनी सांगितले. या वादातूनच तिने आत्महत्या केली असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान तिने पतीला ” सॉरी” असा मॅसेज केला. हा मॅसेज पाहून पती धावत घरी आला. त्यावेळी दरवाजा आतून बंद होता. त्याने थेट दरवाजा तोडला. तर आता मृतदेह दिसून आला. मृतदेह दोरी तुटून खाली पडला होता. यानंतर ही माहिती कोथरुड पोलिसांना मिळाली. त्यांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ससून रुग्णालयात पाठवला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.