Pune : अखेर लोणावळ्यात मान्सून दाखल 

एमपीसी न्यूज – मागील महिनाभरापासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या पर्यटन नगरी लोणावळ्यामध्ये आज सायंकाळी मान्सून खऱ्या अर्थाने दाखल झाला. दिवसभराच्या ढगाळ व धुकेयुक्त वातावरणानंतर सायंकाळी सातपासून लोणावळा शहरात मान्सूनच्या सरी कोसळण्यास सुरुवात झाली.
गत चार दिवसांपासून मान्सूनने संपूर्ण महाराष्ट्र व्यापला असताना पावसाचे माहेरघर असलेल्या खंडाळा घाट माथ्यावरील लोणावळा शहर व मावळ तालुक्यात मात्र मान्सूनने हुलकावणी दिली होती. पावसाने ओढ दिल्यामुळे येथील पर्यटन व्यवसायासह भात शेतीची कामे देखील रखडली होती. मान्सून आज शहरात सक्रिय झाल्यानंतर नागरिकांनी आनंद व्यक्त केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.