Gyanvapi Masjid : बाबरीनंतर आता ज्ञानवापी मशिदीचा मुद्दा पुन्हा चर्चेत; सर्वेक्षणात काय घडले?

एमपीसी न्यूज : आज कडेकोट बंदोबस्तात ज्ञानवापी मशीद संकुलाचे (Gyanvapi Masjid) न्यायालयाने अनिवार्य केलेले व्हिडिओग्राफी सर्वेक्षण पूर्ण झाले.

Gyanvyapi masjid

वाराणसीच्या ज्ञानवापी मशिदीत तीन दिवसांपासून सुरू असलेले सर्वेक्षणाचे काम संपले आहे. तिसऱ्या दिवशी पाहणी पथकाने नंदीच्या मूर्तीजवळील विहिरीची तपासणी केली. हिंदू पक्षाचे वकील विष्णू जैन यांचा दावा आहे की विहिरीत शिवलिंग सापडले असून ते ताब्यात घेण्यासाठी दिवाणी न्यायालयात जात आहेत. मात्र, मुस्लिम पक्षाने हिंदू बाजूचा दावा फेटाळून लावला.

Pimpri News : विश्वकोशातील ग्रंथालयाने समृद्ध केले – हास्यकवी अशोक नायगावकर

तिसऱ्या दिवशी पाहणी पथकाने नंदीच्या मूर्तीजवळ असलेल्या विहिरीची तपासणी केली. पुरातन विहिरीच्या व्हिडिओग्राफीसाठी आत वॉटर प्रूफ कॅमेरा बसवण्यात आला होता. तिसऱ्या फेरीसह सर्वेक्षणाचे काम संपले. तीन दिवसांच्या पाहणीत ज्ञानवापी मशिदीच्या तळघरापासून घुमट आणि पश्चिमेकडील भिंतीपर्यंतचे व्हिडीओग्राफी करण्यात आली. आता हे पुरावे न्यायालयासमोर सादर केले जाणार आहेत.

न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील सर्वोच्च न्यायालयाचे खंडपीठ मंगळवारी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध दाखल केलेल्या अपीलवर सुनावणी करणार आहे. न्यायालयाने नियुक्त केलेल्या आयुक्तांना वाराणसीतील ज्ञानवापी मशिदीचे निरीक्षण, सर्वेक्षण आणि व्हिडिओग्राफी करण्याची परवानगी दिली आहे. यामध्ये हिंदू आणि मुस्लिम दोन्ही गट उपासनेसाठी दावा करत आहेत.

कडेकोट बंदोबस्तात सोमवारी तिसऱ्या दिवशी ज्ञानवापी मशीद (Gyanvapi Masjid) संकुलाचे न्यायालयाने अनिवार्य केलेले व्हिडिओग्राफी सर्वेक्षण पूर्ण झाले. सकाळी 8 वाजता सुरू झालेले मशीद संकुलाचे सर्वेक्षण सकाळी 10.15 च्या सुमारास संपले..

ही मशीद प्रतिष्ठित काशी विश्वनाथ मंदिराजवळ स्थित आहे. बाबरी मशिदी नंतर आता हिंदू गटाचा मोर्चा ज्ञानवापी मशिदीच्या (Gyanvapi Masjid) दिशेने वळला आहे.

हिंदू गट पुढीलप्रमाणे दावा करत आहे –

1. औरंगजेबाने 1869 साली सर्व मंदिरे पाडून मशीद बनवण्याचा आदेश दिला.

2. या आदेशानुसार काशी विश्वनाथच्या जागी मशीद उभी राहिली.

3. येथे भगवान विश्वनाथाचे ज्योतिर्लिंग आहे.

4. बाजूला असलेल्या काशी विश्वेश्वराच्या मंदिरातील नंदीचे तोंड मशिदीच्या दिशेने म्हणजे डाव्या दिशेला आहे. नेहमी नंदीचे तोंड हे ज्योतिर्लिंगाच्या दिशेला असते.

5. या मंदिरात भगवान शंकर, गौरी, नंदी आणि विष्णू मूर्ती आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.