Pune: काँग्रेसच्या गटनेतेपदी निवड झाल्यानंतर आबा बागुल यांचे काँग्रेस भवनमध्ये जोरदार स्वागत

After being elected as the Congress group leader, Aba Bagul was warmly welcomed in the Congress Bhavan बागुल यांनी तब्बल 30 वर्षे नगरसेवक म्हणून काम केले आहे. त्यांच्या अनुभवाचा पक्षाला लाभ होणार असल्याची चर्चा आहे.

एमपीसी न्यूज- पुणे महापालिकेच्या काँग्रेस गटनेतेपदी ज्येष्ठ नगरसेवक आबा बागुल यांची निवड झाल्यानंतर मंगळवारी जोरदार स्वागत करण्यात आले. काँगेस भवन येथे नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनी बागुल यांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी नगरसेविका सुजाता शेट्टी, लता राजगुरू, नगरसेवक रवींद धंगेकर, चांदूशेठ कदम, रफिक शेख, कमल व्यवहारे, मुक्तार शेख, वीरेंद्र किराड, अमित बागुल, हेमंत बागुल उपस्थित होते.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या सूचनेनुसार आबा बागुल यांची निवड करण्यात आली आहे. त्यासंबंधीचे पत्र सरचिटणीस ऍड. गणेश पाटील यांनी महापौर, महापालिका आयुक्तांना पाठविले आहे.

यापूर्वीचे काँग्रेस गटनेते अरविंद शिंदे यांना पक्षातर्फे राजीनामा देण्यास सांगण्यात आले होते. त्यानंतर कोरोनाच्या संकटामुळे काही महिने ही निवड लांबणीवर पडली होती.

बागुल यांनी तब्बल 30 वर्षे नगरसेवक म्हणून काम केले आहे. त्यांच्या अनुभवाचा पक्षाला लाभ होणार असल्याची चर्चा आहे. आगामी 2022 च्या पुणे महापालिका निवडणुकीसाठी ही निवड महत्वपूर्ण मानली जात आहे.

बागुल हे विधान परिषदेवर जाण्यासाठी इच्छुक होते. तशी मागणीही त्यांनी बाळासाहेब थोरात यांच्याकडे केली होती.

पर्वती विधानसभा मतदारसंघात त्यांना सातत्याने डावलले जात आहे. अन्याय होत असल्याची भावना त्यांच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली होती. अखेर बागुल यांना महापालिकेच्या गटनेतेपदी दुसऱ्यांदा काम करण्याची संधी देण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.