Sangvi : कट मारल्याचा जाब विचारल्यावरुन तरुणाच्या गालावर चावीने वार

एमपीसी न्यूज – दुचाकीने कट मारल्याचा जाब विचारल्याने दोघांनी मिळून एका तरुणाला हाताने मारहाण केली. तसेच त्याच्या गालावर चावीने वार केला. ही घटना शुक्रवारी (दि. 18) रात्री सव्वादहाच्या सुमारास जुनी सांगवी येथे घडली.

रोहित दुर्गेश धर्माधिकारी (वय 18, रा. प्रियदर्शननगर, जुनी सांगवी) याने याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार सिद्धांत निकाळजे (रा. पवनानगर, जुनी सांगवी), राजकिरण घुटे (रा. जयमालानगर, जुनी सांगवी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सिद्धांत याने फिर्यादी रोहितच्या दुचाकीला कट मारला. रोहितने याचा जाब विचारला असता आरोपी राजकिरण याने त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच सिद्धांत याने रोहितच्या गालावर चावीने वार करून त्यास जखमी केले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.