Omicron News: संसर्गमुक्त झाल्यानंतर 26 रुग्णांना कळले ‘ओमायक्रॉन’ची बाधा झाल्याचे

एमपीसी न्यूज – कोरोनाचा नवीन विषाणू असलेल्या ‘ओमायक्रॉन’चा संसर्ग झालेल्या आणखी 29 नवीन रुग्णाचा आज (शुक्रवारी) रँन्डम तपासणीत ‘ओमायक्रॉन’चा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. दरम्यान, 29 पैकी 26 रुग्णांना दहा दिवस पूर्ण झाल्याने केलेली चाचणी निगेटिव्ह आली. त्यामुळे त्यांना घरी सोडण्यात आले. त्यांचा ओमायक्रॉनचा रिपोर्ट उशिरा आला. संसर्गमुक्त झाल्यानंतर आपल्याला ‘ओमायक्रॉन’ची लागण झाल्याचे या रुग्णांना समजले.

आफ्रिका आणि युरोपीय देशांमध्ये ओमायक्रॉन या नव्या उत्परिवर्तित विषाणूचा प्रादुर्भाव होत आहे. केंद्र व राज्य शासनाने खबरदारीच्या उपाययोजना करण्यास सूचित केले आहे. त्यानुसार महापालिकेकडून आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत. ओमायक्रॉन या नव्या व्हेरिएंटच्या अनुषंगाने महापालिकेतर्फे तपासणी मोहीम सुरू आहे.

शहरातील 29 जणांचे रँन्डम तपासणीत ‘ओमायक्रॉन’चा रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. रिपोर्ट येण्यास विलंब झाला. तोपर्यंत 26 रुग्णांचे दहा दिवस पूर्ण झाले होते. दहा दिवस पूर्ण झाल्याने त्यांची केलेली चाचणी निगेटिव्ह आली. त्यामुळे त्यांना घरी सोडण्यात आले. तर, उर्वरित 3 रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. परदेशातून आलेल्या 108 कोरोना बाधित रुग्णांपैकी 95 रुग्णांची पुन्हा 10 व्या दिवशी तपासणी करण्यात आली. त्याचा अहवाल निगेटीव्ह आला असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.