India Corona Update : जवळपास दोन वर्षानंतर ॲक्टिव्ह रुग्णसंख्या 13 हजारांच्या खाली

एमपीसी न्यूज – भारतातून कोरोना संसर्ग पळ काढत आहे. जवळपास दोन वर्षानंतर देशातील दैनंदिन रुग्णवाढ आणि ॲक्टिव्ह रुग्णसंख्या खाली आली आहे. गेल्या 24 तासांत देशभरात 913 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. देशातील ॲक्टिव्ह रुग्णसंख्या कमी झाली असून, जवळपास दोन वर्षानंतर ॲक्टिव्ह रुग्णसंख्या 13 हजारांच्या खाली आली आहे. 

सध्याच्या घडीला देशात 12 हजार 597 ॲक्टिव्ह कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मागील 714 दिवासांतील ही निचांकी ॲक्टिव्ह रुग्णसंख्या आहे. देशातील 4 कोटी 24 लाख 95 हजार 089 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. गेल्या 24 तासांत 1,316 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. देशाचा रिकव्हरी रेट वाढून 98.76 टक्के एवढा झाला आहे.

गेल्या 24 तासांत देशात 13 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आजवर 5 लाख 21 हजार 358 रुग्ण कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले आहेत. देशाचा मृत्यूदर 1.20 टक्के एवढा झाला आहे. ICMR च्या आकडेवारी नुसार देशात आजवर 79.10 कोटी प्रयोगशाळा नमुने तपासण्यात आले आहेत. गेल्या 24 तासांत 3.14 चाचण्या घेण्यात आल्या आहेत.

देशात कोरोना लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत आजवर 184.70 कोटी नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस टोचण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.