Pimpri Corona Update : दीड महिन्यानंतर कोरोनामुळे एकाचा मृत्यू

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात दीड महिन्यानंतर बुधवारी कोरोनामुळे एका रुग्णाचा मृत्यू झाला. शहराच्या विविध भागातील केवळ 61 नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली. तर, कोरोनामुक्त झालेल्या 60 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

कोरोनामुळे महापालिका हद्दीतील एका रुग्णाचा आज मृत्यू झाला.तीन महिन्यानंतर 7 जुलै रोजी कोरोनामुळे एका महिलेचा मृत्यू झाला होता.त्यानंतर दीड महिन्यांनी आज कोरोनामुळे एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.आजपर्यंत शहरातील 4 हजार 628 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.शहरातील 3 लाख 69 हजार 57 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली. सध्या 411 सक्रिय रुग्ण शहरात आहेत. त्यातील 381 रुग्ण  गृहविलगीकरणात उपचार घेत आहेत.

तर, 30 रुग्ण महापालिका रुग्णालयामध्ये दाखल आहे. आज दिवसभरात 792 नागरिकांचे लसीकरण झाले. आजपर्यंत 37 लाख 31 हजार 791 जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.