Savita Malpekar To Join NCP: प्रिया बेर्डे यांच्यानंतर सविता मालपेकर करणार राष्ट्रवादीत प्रवेश

After Priya Berde, Savita Malpekar will join NCP सविता मालपेकर यांच्यासोबत गीतकार आणि अभिनेते बाबा सौदागर, प्रसिद्ध अभिनेत्री अर्चना नेवरेकरही राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतील.

एमपीसी न्यूज – काही दिवसांपूर्वीच प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यापाठोपाठ आता सविता मालपेकर याही राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार असल्याचे समजते आहे.

‘टीव्ही 9’ या वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, सविता मालपेकर यांच्यासोबत गीतकार आणि अभिनेते बाबा सौदागर, प्रसिद्ध अभिनेत्री अर्चना नेवरेकरही राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतील.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत लवकर त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सांस्कृतिक सेलचे प्रदेश कार्याध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी ही माहिती दिली.

अभिनेत्री सविता मालपेकर यांनी 1988 मध्ये ‘आई पाहिजे’ चित्रपटातून मनोरंजन विश्वात पदार्पण केलं. ‘गाढवाचं लग्न’ या नाटकातील त्यांची भूमिका प्रचंड गाजली. त्यांनी अनेक सिनेमा आणि नाटकांमध्ये काम केलं आहे.

मुळशी पॅटर्न, काकस्पर्श या सिनेमांमधल्या त्यांच्या भूमिका गाजल्या. मराठी नाटक, सिनेमा, मालिकांमध्ये त्यांनी आपल्या अभिनयाचा वेगळा ठसा उमटवला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.