Pune News : अपघातानंतर जाब विचारण्यासाठी गेलेल्या तरुणाच्या छातीत लाथा घातल्या, जागीच मृत्यू

एमपीसी न्यूज : अपघात झाल्यानंतर त्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या तरुणाच्या छातीत लाथा घातल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. थेऊर येथील सार्वजनिक रस्त्यावर 25 सप्टेंबर रोजी हा प्रकार घडला. लोणी काळभोर पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सुंदर शिवा पवार असे मृत्यूमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी आदित्य सुधीर धाराशिवकर (वय 23, रा. कामधेनू इस्टेट हडपसर पुणे) याला अटक केली आहे. या प्रकरणी विठ्ठल शिवा पवार यांनी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, मयत सुंदर शिवा पवार आणि फिर्यादी दुचाकीने जात होते. यावेळी आरोपीच्या चार चाकी टेम्पो चा धक्का फिर्यादी यांच्या दुचाकीला लागला. यामध्ये त्यांच्या भावाला किरकोळ जखम झाली. त्याचा जाब विचारण्यासाठी सुंदर शिवा पवार टेम्पो जवळ गेला असता आरोपीने टेम्पो मधून त्याच्या छातीमध्ये चार ते पाच लाथा मारल्या. यामध्ये बेशुद्ध झालेल्या सुंदर यांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली असून खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.