Pimpri : स्वच्छता सप्ताह अंतर्गत मोरवाडी परिसर केला चकाचक

एमपीसी न्यूज – स्वच्छ भारत अभियान सप्ताह अंतर्गत ‘अ’ प्रभागाच्या अध्यक्षा अनुराधा गोरखे यांच्या पुढाकाराने प्रभागातील मोरवाडी परिसरात आज (बुधवारी) स्वच्छता मोहीम राबविण्यात आले. सकाळी साडेसात ते दहा या अडीच तास राबविलेल्या अभियानात संपूर्ण परिसर, रस्ते चकाचक करण्यात आले.

प्रभागाच्या अध्यक्षा अनुराधा गोरखे, प्रभाग अधिकारी आशादेवी दुरगुडे, आरोग्यधिकारी एम.एम.शिंदे, बापू गायकवाड, दीपक कोठीयाना, मोरवाडी आयटीआयमधील शिक्षक, विद्यार्थी, स्वच्छता कर्मचा-यांसह 80 जण यामध्ये सहभागी झाले होते.

25 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर दरम्यान स्वच्छता सप्ताह साजरा करण्यात येत आहे. त्यानुसार ‘अ’ प्रभागात स्वच्छता सप्ताहाला सुरुवात करण्यात आली. प्रभागातील मोरवाडी एमआयडीसी, न्यायालय परिसर, आयुक्त बंगला या परिसरात बुधवारी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. परिसरातील संपूर्ण रस्ते चकाचक करण्यात आले आहेत. आठ दिवस दररोज प्रभागात स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे.

अनुराधा गोरखे म्हणाल्या, ‘नागरिकांनी स्वच्छता पाळणे गरजेचे आहे. स्वच्छता पाळणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. आपला परिसर, शहर स्वच्छ ठेवण्याची प्रत्येकाची जबाबदारी आहे. महापालिका शहर स्वच्छ ठेवतच आहे. परंतु, प्रत्येक नागरिकाने देखील आपले शहर स्वच्छ रहावे यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. रस्त्यावर थुंकू नये, कचरा पेटीतच टाकावा. प्रदूषण टाळावे. विद्यार्थ्यांना शालेय जीवनातच स्वच्छतेचे महत्व पटवून देण्यात यावे ‘ तसेच ‘अ’ प्रभागात आठ दिवस दररोज वेगवेगळ्या परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार असल्याचेही, त्यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.