Pimpri : ध्वजहरोहण झाल्यानंतर गप्पा मारत थांबलेल्या तरुणाला पूर्ववैमनस्यातून मारहाण

एमपीसी न्यूज – प्रजासत्ताक दिनाचे ध्वजहरोहण झाल्यानंतर तरुण मित्रांसोबत गप्पा मारत थांबला होता. त्यावेळी आलेल्या नऊ जणांच्या टोळक्याने तरुणाला मारहाण केली. ही घटना शनिवारी (दि. 26) दुपारी भवानी चौक येथे घडली.

याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात निकुल ऊर्फ कुणाल सुनिल वेताळ (वय 19, रा. गांधीनगर, पिंपरी) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार वैभव हटांगळे (वय 21, रा. घरकुल चिखली) आणि त्याचे आठ साथीदार यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

यावेळी पोलिसांनी दिलेल्या मिहीतीनुसार, फिर्यादी निकुल प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजहरोहण करण्यासाठी गेला होता. निकुल आणि आरोपी यांच्यामध्ये मागील काही दिवसांपूर्वी भांडण झाले होते. त्या भांडणाच्या रागातून आरोपींनी निकुल याला भवानी चौकात अडवून ‘तू भाई झालास का, थांब तुझी वाट लावतो ‘ असे म्हणत आरोपी कोयता उगारून निकुलच्या अंगावर आला. निकुल घाबरून पळून जात असताना आरोपीच्या साथीदारांनी त्याचा पाठलाग करून सिमेंटचा गट्टू फेकून मारला. सिमेंटचा गट्टू डोक्याच्या मागील बाजूला लागल्याने निकुल चक्कर येऊन खाली पडला. त्यावेळी आरोपींनी त्याला लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक वाघमारे तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.