Navale Bridge Accident : नवले पूल अपघातानंतर प्रशासनाला जाग, मार्गावर राबवणार विविध उपाययोजना

एमपीसी न्यूज – ठेच लागल्यानंतर शहाणपण येते म्हणतात त्या प्रमाणे मुंबई- बंगलूरू राष्ट्रीय महामार्गावर भेट देऊन, भविष्यात असे अपघात होऊ नये, यासाठी वाहतूक पोलिसांकडून काही उपाय योजना करण्यात आल्या आहेत, ज्यामध्ये जड वाहनांना विशेष नियम व वेग मर्यादा यांचा समावेश आहे. यासंबंधी वाहतूक पोलिसांनी सोमवारी (दि.21) एक पत्रक प्रसिद्ध केले आहे.

अपघातानंतर केवळ वाहतूक पोलीसच नाही तर राजकारणी लोकांनीही याकडे विशेष लक्ष दिले. मात्र या आधीपासून नागरिक या मार्गावर होणाऱ्या गैरसोयी बद्दल बोलत होते. चुकलेली रस्त्यांची रचना. तीव्र उतार आणि वळणे एकत्र झाल्याने नवले पूल हा अपघाताचे केंद्र बनला आहे.

Navale Bridge Accident : नवले पूल अपघात प्रकरणातील ट्रक चालक अखेर पोलिसांच्या जाळ्यात, चाकण परिसरातून घेतलं ताब्यात

यासंदर्भात प्रशानानाने पहाणी करून अपघात टाळण्यासाठी काही उपाय योजना बनवल्या आहेत त्या पुढील प्रमाणे:

1) मुख्य उतार कमी करणे, स्वामी नारायण मंदिर ते दरीपुल मधील तीव्र वळण कमी करणे.

2) विविध ठिकाणी रम्बलर स्ट्रिप्स व रिफ्लेक्टर बसविणे.

3) जड वाहनांची स्पीड लिमीट टप्याटप्याने कमी करणे.

4) सर्व्हिस रस्ता रुंद करणे, दुरुस्ती करणे, तेथील अतिक्रमणे काढणे.

5) नवीन बोगद्यापासून नवले पुलापर्यंत विविध ठिकाणी वाहनांचा वेग कमी करण्यासंदर्भात अनाउंसमेंट करीता ऑडीओ सिस्टीम बसविणे.

6) जड वाहनांची स्पीड लिमीट 40 करणे.

7) रम्बलर स्ट्रीप दर 300 ते 400 मीटरच्या अंतरावर करणे तसेच प्रत्येक दोन महिन्यांनी त्यांची डागडुजी व देखभाल करणे.

8) स्पिड गन व कॅमेरे बोगद्या पासून थोडा-थोडा अंतरावर 2 ते 3 ठिकाणी बसविणे.

9) नऱ्हे सर्व्हिस रोड व महामार्गाला मिळणा-या सर्व छोट्या रस्त्यांवर रम्बलर स्ट्रिप बसविणे.

10) स्ट्रिट लाईट संख्या वाढविणे.

11) नागरिक महामार्गावर येणार नाहीत, या दृष्टीने नन्हे सेल्फी पॉईंट हटविणे, तेथील पायऱ्या तोडणे.

12) पुल सुरु होताना व पुलावर विविध ठिकाणी ब्लिंकर बसविणे.

13) महामार्गावर लावण्यात आलेले विविध प्रकारचे साईन बोर्डस् हे रस्त्याचे डावे बाजूस असून वाहनचालकांना ते स्पष्ट दिसावे याकरिता ते रस्त्याच्या मध्यभागी दर्शनी भागावर लावण्यात येणार आहेत.

मात्र, पुण्यातील वाहतूक कोंडी असेल किंवा अपघात असेल त्याला राजकारणी सहभाग किंवा मोठा अपघात होण्याचीच प्रशासन वाट बघणार आहे का? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक उपस्थित करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.