Maval : मावळात २५ वर्षांनंतर सुनीलआण्णांच्या रुपाने सत्ता परिवर्तन होईल – अजित पवार

एमपीसी न्यूज – युवा नेते सुनील शेळके यांच्या रुपाने मावळात २५ वर्षांनंतर सत्ता परिवर्तन पहायला मिळेल, असा विश्वास माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला.

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते मावळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनील शेळके यांना आज दुपारी मुंबईत एबी फॉर्म प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. अजितदादांनी शेळके यांच्या कार्याचे व अफाट लोकप्रियतेचे कौतुक केले व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये स्वागत केले.

त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे तसेच संतोष भेगडे, सचिन घोटकुले, दत्तात्रय पडवळ आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.