Lockdown in China : चीनमध्ये कोरोनाचा पुन्हा शिरकाव, 40 लाख लोकसंख्येच्या शहरात लॉकडाऊन

एमपीसी न्यूज – चीनच्या वुहान शहरातून जन्माला आलेल्या कोरोना विषाणूने जवळपास दोन वर्षांपासून जगाला वेठीस धरले आहे. डिसेंबर 2019 मध्ये वुहान शहरातील ‘वेट मार्केट’ मधून कोरोना संसर्ग जन्माला आला होता. आता जगभरातील संसर्ग आटोक्यात येत असताना चीन मधून पुन्हा एकदा धक्कादायक बातमी समोर आली आहे. चीनमध्ये कोरोनाचा पुन्हा शिरकाव झाला असून, 40 लाख लोकसंख्या असलेल्या लान्झु शहरात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे.

एएफपी या आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेने याबाबत वृत्त दिले आहे. ‘चीनमध्ये कोरोनाचा पुन्हा शिरकाव झाला असून, 40 लाख लोकसंख्या असलेल्या लान्झु शहरात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे.’ असं त्यांनी म्हटलं आहे. प्रत्येक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर लसीकरण झाल्याने कोरोना संसर्गाचा वेग मोठ्या प्रमाणावर मंदावला आहे. पण, असे असले तरी संसर्गाचा धोका कायम आहे. अशात चीनमधून आलेली लॉकडाऊनची बातमी चिंता वाढवणारी आहे.

 

दरम्यान, सध्याच्या घडीला देशात 1 लाख 63 हजार 816 ॲक्टिव्ह कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. गेल्या 24 तासांत देशभरात 12 हजार 428 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून, त्यापैकी 6 हजार 664 रुग्ण एकट्या केरळमध्ये वाढले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.