Chakan : पाकिस्तानचा झेंडा जाळून दहशतवादी हल्ल्याचा निषेध

चाकणमध्ये महामार्ग रोखण्याचा प्रयत्न

एमपीसी न्यूज- पाकिस्तान मुर्दाबाद, काश्मीर मांगेंगे तो चिर देंगे, भारत माता की जय ! अशा जोरदार घोषणा देत पाकिस्तानचा झेंडा भर रस्त्यात पेटवून देत महामार्ग रोखण्याचा प्रयत्न शुक्रवारी (दि. 15) सायंकाळी पाचच्या सुमारास चाकण येथे करण्यात आला.

चाकण येथील माणिक चौकात खेडचे आमदार सुरेश गोरे यांच्या नेतृत्वाखाली पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा पाकिस्तानचा राष्ट्रध्वज जाळून निषेध केला गेला. त्याच प्रमाणे देशासाठी वीरमरण पत्करलेल्या सर्व हुतात्ना जवानांना आदरांजली अर्पण करण्यात आली. शिवसेना आणि चाकणकर नागरिक यांच्याकडून हा निषेध करण्यात आला.

आमदार गोरे यांनी या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला. यावेळी चाकणच्या माजी नगराध्यक्षा मंगला गोरे, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शिवाजी वर्पे, शहरप्रमुख महेश शेवकरी, नंदा कड, प्रकाश वाडेकर , चाकण न.प.चे सर्व नगरसेवक, पदाधिकारी आदींसह कार्यकर्ते नागरिक मोठ्या संखेने उपस्थित होते. यावेळी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आंदोलनानंतर पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना रस्त्यातून बाजूला करीत वाहतूक पूर्ववत केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.