Pune: महावितरण भरती प्रकियेत कंत्राटी कामगारांना प्राधान्य देण्यासाठी ‘टाळ’ आंदोलन

agitation for to give priority to contract workers in MSEDCL recruitment process in pune पुणे प्रादेशिक कार्यालय येथे टाळ वाजवून आंदोलन करण्यात आले.

एमपीसी न्यूज- महावितरण कंपनीत 7000 जागा भरल्या जाणार आहेत. त्यामुळे 7000 वीज कंत्राटी कामगारांच्या रोजगारावर गदा येणार आहे. कंत्राटी कामगारांना भरती प्रकियेमध्ये समाविष्ट करण्यात यावे अशी मागणी महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाच्या वतीने करण्यात आली आहे.

या मागणीचा भाग म्हणून बुधवारी (दि.1) पुणे प्रादेशिक कार्यालय येथे टाळ वाजवून आंदोलन करण्यात आले.

आंदोलनाचे नेतृत्व महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचे अध्यक्ष नीलेश खरात, सरचिटणीस सचिन मेंगाळे, कार्याध्यक्ष उमेश आणेराव, संघटनमंत्री राहुल बोडके, पुणे जिल्हा अध्यक्ष प्रविण पवार, सेक्रेटरी सुमित कांबळे यांनी केले. तसेच पुणे जिल्ह्यातील विविध पदाधिकारी उपस्थित होते.

या आंदोलनाबाबत 8 जून रोजी मुख्यमंत्री, ऊर्जामंत्री, प्रधान ऊर्जा सचिव व तिन्ही कंपनी व्यवस्थापन प्रशासनाला नोटीस देण्यात आली होती. मात्र, अद्याप कोणीही चर्चेसाठी बोलवले नाही.

कंत्राटी कामगारांना भरतीमध्ये सामावून घ्यावे, आरक्षण द्यावे, कंत्राटदार विरहित शाश्वत रोजगार द्यावा, या प्रमुख मागण्या असल्याचे महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचे सरचिटणीस सचिन मेंगाळे यांनी म्हटले.

दरम्यान, महावितरण भरती प्रकियामध्ये कंत्राटी कामगारांना प्राधान्य देऊन त्यांना कायम करण्यात यावे. याकरिता महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ संलग्न भारतीय मजदूर संघाच्या वतीने खासदार गिरीश बापट यांना देखील निवेदन देण्यात आले होते.

खासदार बापट यांनी उर्जा मंत्री यांच्याकडे पाठपुरावा करून वीज ऊद्योगातील कंत्राटी कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.