Pune : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलक आक्रमक ; पोलिसांवर चप्पल फेक

एमपीसी न्यूज –  पुणे जिल्हाधिकारी समोर परीस्थिती नियंत्रणाबाहेर गेली असून आंदोलकांनी बाटल्या फेकल्या , चप्पल आणि बूट पोलिसांच्या दिशेने फेकल्या. आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवरील काचा देखील फोडल्या आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलनादरम्यान आंदोलक आक्रमक झाले होते. आंदोलकांनी कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला. जोरदार घोषणा देत आंदोलक आक्रमक  झाले असून जिल्हाधिकारी कार्यालयाचे गेट तोडले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.