Sangvi : सांगवीत नदीपात्रात आढळला अज्ञात इसमाचा मृतदेह

एमपीसी न्यूज – सांगवी येथे नदीपात्रात अज्ञात इसमाचा मृतदेह आढळला. पिंपरी अग्निशमन दलाच्या कर्मचा-यांनी मृतदेह बाहेर काढला असून इसमाची अद्याप ओळख पटली नाही.

मृतदेह आढळलेल्या इसमाचे वय अंदाजे 40 वर्ष आहे. त्याची अद्याप ओळख पटली नसून मृतदेह शवविच्छेदनासाठी यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.

अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार, आज (गुरुवारी) सकाळी अकराच्या सुमारास नवी सांगवी येथे नदीपात्रात अज्ञात इसमाचा मृतदेह आढळल्याची माहिती एका स्थानिक नागरिकाने अग्निशमन दलास दिली. त्यानुसार संत तुकाराम अग्निशमन दलाचा एक बंब घटनास्थळी दाखल झाला. मागील तीन दिवसांपूर्वी इसमाचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. तीन तासांच्या प्रयत्नानंतर मृतदेह बाहेर काढण्यात आला. ही कामगिरी पिंपरी अग्निशमन दलाचे  फायरमन गाजरे, भूषण येवले, विठ्ठल सपकाळ, संतोष वारे, सावळी यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.