Pune News : अग्निवीर भरती प्रकियेचा निकाल घोषित

एमपीसी न्यूज : भारतीय लष्करामध्ये अग्नीपथ योजनेंतर्गत अग्निवीर भरतीसाठी अहमदनगर जिल्ह्यातील महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे पार पडलेल्या ‘अग्नीवीर भरती’ मेळाव्यात उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांचे निकाल https://joinindianarmy.nic.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. उमेदवारांनी पुणे क्षेत्रीय भरती कार्यालयात 26 नोव्हेंबर पर्यंत हजर होऊन कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

Nigdi News : सोसायटीच्या पार्किंग मधून दुचाकी चोरीला

अग्निवीर भरती प्रकियेचा निकाल घोषित जनरल ड्युटी, अग्नीवीर टेक्निकल, अग्निवीर भरती प्रकियेचा निकाल घोषित क्लर्क/स्टोअरकीपर आणि अग्निवीर भरती प्रकियेचा निकाल घोषित ट्रेड्समन या पदांसाठी 23 ऑगस्ट ते 11 सप्टेंबर 2022 दरम्यान ही भरती प्रक्रिया पार पडली.(Pune News) या भरती मेळाव्यामध्ये पुण्यासह अहमदनगर, लातूर, उस्मानाबाद, बीड आणि सोलापूर जिल्ह्यातील उमेदवारांनी सहभाग घेतला होता, अशी माहिती भरती क्षेत्रीय कार्यालय पुणेचे संचालक मनिष कर्की यांनी दिली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.