Agrasen Jayanti : विविध उपक्रमांनी अग्रसेन महाराजांची जयंती साजरी 

एमपीसी न्यूज : श्री अग्रसेन ट्रस्ट चिंचवड़ प्राधिकरणच्या वतीने अग्रसेन महाराजांची जयंती आनंदात व उत्साहात साजरी करण्यात आली. (Agrasen Jayanti) यावेळी निगडी ते चिंचवड या दरम्यान श्री अग्रसेन शोभायात्रा काढण्यात आली. यामध्ये सुमारे 700 बांधव सहभागी झाले होते.

26 सप्टेंबर हा अग्रवाल बांधवांसाठी अत्यंत महत्वाचा दिवस होता. युगप्रवर्तक श्री श्री श्री अग्रसेन महाराज अग्रवाल समाजाचे दैवत यांची 5124 वी जयंती श्री अग्रसेन ट्रस्ट चिंचवड़ प्राधिकरण येथील अग्रवाल समाजाने उपस्थित राहुन उत्साहने साज़री केली. निगडी ते चिंचवड या दरम्यान श्री अग्रसेन शोभायात्रा काढण्यात आली. यामध्ये सुमारे 700 बांधव सहभागी झाले होते. सर्व नगरसेवकांनी शुभेच्छा फलक लावून. महाराजांच्या प्रतिमेला हार अर्पण केला. ही शोभायात्रा अग्रसेन गार्डन भक्ती शक्ती पासुन सुरु झाली.

यावेळी अग्रवाल समाज फेडरेशनचे अध्यक्ष उद्योजक  कृष्णकुमार गोयल, म्हणाले की, सद्याची कार्यकारिणी समिती मनापासुन समाज बांधवांना जोडण्याचे कार्य करीत आहेत. समाजात असे पण लोक आहेत, कि जे स्वतः काहीच करत नाही. दुसऱ्यांना करु देत नाहीत.(Agrasen jayanti) ते फक्त चांगल्या कार्यात अडथळे निर्माण करतात. त्याना न घाबरता. तुम्ही प्रमाणिकपणे काम करावे ,समजाने अशा लोकांना खड्या सारख़े बाज़ुला काढ़ावे आणि   समजाला सशक्त व  सुदृढ़ बनवावे.

National Tourism Award : , महाराष्ट्र राज्याला दुसरा क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय पर्यटन पुरस्कार

या शोभायात्रेची सांगता चिंचवड येथील श्री अग्रसेन भवन येथे झाली. या कार्यक्रमचे मुख्य अतिथि गोयल अग्रवाल समाज पुणे चे अध्यक्ष ईश्वरचंद किशोरीलाल गोयल होते तर अपर्णा मित्तल प्रिन्सिपल कमिशनर इनकम टॅक्स विभाग  यांनी फोनवरुन सर्वांना शुभेच्छा दिल्या.(Agrasen jayanti) ट्रस्टचे अध्यक्ष सुनिल आर अग्रवाल मान्यवरांच्या हस्ते समाजाचे नवीन डिजिटल ॲपचे उदघाटन केले.  सर्व विद्यार्थी , डॉक्टर , इंजीनियर , उच्च शिक्षितांचा सन्मानचिन्ह देवून सन्मानित केले.सर्वांचे आभार सचिव सत्पाल मित्तल यांनी मानले.

या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी  कार्याध्यक्ष सुभाष बंसल , सुनिल अग्रवाल , अशोक बंसल , जगदीशप्रसाद सिंघल , सीए के एल बंसल , विनोद बंसल , विनोद मित्तल , जोगिन्दर मित्तल , सांस्कृतिक समितीचे  गौरव अग्रवाल , आनंद अग्रवाल , धर्मेंद्र अग्रवाल , संदीप गुप्ता , सागर अग्रवाल यांचे मोलाचे सहकार्य लाभले. श्री अग्रसेन ट्रस्ट तर्फे श्री अग्रसेन जयंती निमित्ताने केलेले सर्व कार्यक्रमास अग्रवाल बंधु भगिनी , युवक युवतीचा , पंच समिति , माजी अध्यक्ष , अग्रसेन यूथ , अग्रवाल महिला वर्ग सहभागी झाले होते.

23 सप्टेंबर शुक्रवारी रामकृष्ण मोरे नाट्यगृहात मस्त मस्त म्यूज़िकल तबला संदीप पंचवाटकर यांनी सादर केला.मुख्य अतिथी म्हणून येस क्लबचे संस्थापक नरेश रामचंद्र मित्तल ,(Agrasen Jayanti) आमदार अण्णा बनसोडे , माज़ी महापौर शैलजाताई मोरे , माजी विरोधी पक्षनेते राजू मिसाळ , अ प्रभाग अध्यक्षा शर्मिला बाबर , भाजपचे प्रदेश सचिव अमित गोरखे , सामाजिक कार्यकर्ते निलेश शिंदे मान्यवर उपस्थित होते.

ट्रस्टचे अध्यक्ष सुनिल आर अग्रवाल यांनी  समाजास एक अध्यायात , उच्च तंत्रज्ञानाने सुसज्जित हॉस्पिटल ची गरज आहे.साठी एकत्र येवून सढ़ळ हातानी मदत  करण्याचे आवाहन त्यांनी केले. 24 सप्टेंबर शनिवारी अग्रसेन भवन येथे अग्रवाल समाज महिला मंडळाच्या सहकार्याने , चित्रकला, विविध व्यंजन , सलाड  डेकोरेशण , मेकअप , गिफ़्ट हॅम्पर या स्पर्धा घेण्यात आल्या , स्पर्धकांची  अविश्वसनीय उपस्थिती  होती. यासाठी महिला अध्यक्ष रेनु सतपाल मित्तल , रजनी गोयल , मीनल जाजोधिया सहकार्य केले.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.