Maharashtra News : अहमदनगरचे होणार ‘अहिल्यानगर’; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची घोषणा

एमपीसी न्यूज – अहमदनगरचे नाव ‘अहिल्यानगर’ होणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. अहमदनगर येथील चौंडी येथे (Maharashtra News) अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत बोलत होते.

Bhosari : तरुणांमध्येही व्हॉलीबॉल खेळाची आवड निर्माण व्हावी – महेश लांडगे

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची आज (31 मे) 298 वी जयंती साजरी झाली. यानिमित्ताने त्यांचे जन्मगाव असलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी येथे कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सदाशिव लोखंडे, सुजय विखे, राम शिंदे, गोपीचंद पडळकर आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “अहमदनगर जिल्ह्याचे लवकरच नामांतर होणार आहे. अहमदनगर जिल्ह्याला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्यात येणार आहे. याबाबतचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.”

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आमच्या सरकारने औरंगाबादचे नामांतर छत्रपती संभाजीनगर केले. उस्मानाबादचे नामांतर धाराशिव केले. आता अहमदनगरचे नामांतर देखील केले जाणार आहे. अहमदनगरचे नामांतर अहिल्यानगर असे केले जाणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात हे नामांतर होईल.

देशात न्यायप्रिय राजा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचे उदाहरण दिले जाते. तसाच आदर्श कारभार अहिल्यादेवी होळकर यांनी केला. परिवर्तनवादी, पुरोगामी राज्य त्यांचे होते. दारूविरोधात त्यांनी काम केले. क्षयरोग निवारण करण्यासाठी त्यांनी काम केले आहे. राजमाता अहिल्यादेवींनी स्वतःची तिजोरी सर्वसामान्यांसाठी खुली केली.

अहमदनगर जिल्ह्याला अहिल्यानगर (Maharashtra News) असे नाव देण्याची मागणी होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात छत्रपती संभाजीनगर, धाराशिव झाले. आता अहिल्यानगर देखील होणार असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.