Pune : संस्कार प्रतिष्ठानची पालवीला मदत

एमपीसी न्यूज – समाजाचे काहीतरी देणे लागते, ही सामाजिक बांधिलकी जोपासत संस्कार प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य पिंपरी चिंंचवड शहरच्या वतीने सोलापूर जिल्हा पंढरपूर येथील पालवी या विशेष मुलांच्या आश्रमातील ११० मुला-मुलींना १५५ किलो साखर, २५ किलो रवा, २० किलो मैदा, कोलगेट ५० नग, तेल २५ नग, रिन १० नग, तांदुळ १० किलो, उटणे १०० पाकिटे, २५ मसाले पाकिटे, बिस्किट पुडा बॉक्स, पणती ६ नग आदी साहित्य शनिवारी (दि.9) दुपारी ३.०० वाजता वाटप करण्यात आले.

यासाठी डॉ. दिपाली हेबरे, जयंत सावंत, रुपाली नामदे, आनंद पुजारी, सुनंदा निक्रड, पल्लवी पवळे यांनी मदत केली.
हे साहित्त्य घेऊन आज प्रत्यक्ष संस्थेचे अध्यक्ष डॉ. मोहन गायकवाड, भरत शिंदे, मीलन गायकवाड, राहुल पाटील, मोहिनी चव्हाण गेले होते. या सर्वांच्या हस्ते वाटप केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.