Air India : एअर इंडियाचा इतिहासातील सर्वात मोठा करार; 250 विमाने खरेदी करण्याची घोषणा

एमपीसी न्यूज : एअर इंडियाने एअरबसकडून 250 विमाने (Air India) खरेदी करण्याची मोठी घोषणा केली आहे. यामध्ये 40 मोठ्या आकाराच्या विमानांचा समावेश आहे. या विमानांच्या खरेदीसाठी एअरबसशी इरादा पत्रावर स्वाक्षरी करण्यात आली आहे. या कार्यक्रमाला पंतप्रधान मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉनही उपस्थित होते. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले, की भारत आणि फ्रान्स एकत्रितपणे इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील सुरक्षा आणि स्थिरता याशिवाय जागतिक अन्न आणि आरोग्य सुरक्षा क्षेत्रात सकारात्मक योगदान देत आहेत. भारताची एअर इंडिया आणि फ्रान्सची एअरबस यांच्यात विमान खरेदीच्या कराराच्या निमित्ताने ते बोलत होते.

PCMC : 6679 खड्डे बुजविण्यासाठी पालिका तिजोरीला सव्वा दोन कोटींचा खड्डा

व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आयोजित कार्यक्रमात मोदी म्हणाले की, आज भारत-फ्रेंच भागीदारी आंतरराष्ट्रीय व्यवस्था आणि बहुपक्षीय व्यवस्थेची स्थिरता आणि संतुलन सुनिश्चित करण्यात थेट भूमिका बजावत (Air India) आहे.

या कराराचे कौतुक करताना ते म्हणाले की, भारताच्या वाढत्या विमान वाहतूक क्षेत्राला पुढील 15 वर्षांत 2,000 पेक्षा जास्त विमानांची आवश्यकता असेल. इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील सुरक्षा आणि स्थिरतेचा मुद्दा असो किंवा जागतिक अन्न सुरक्षा आणि आरोग्य सुरक्षा असो, भारत आणि फ्रान्स एकत्रितपणे सकारात्मक योगदान देत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.