Dehuroad : एअर इंडियामध्ये नोकरी लावण्याच्या बहाण्याने पावणेआठ लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – एअर इंडियामध्ये नोकरी लावण्याचे आमिष दाखवून 7 लाख 85 हजार रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी एका महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मे 2019 मध्ये विकासनगर देहूरोड येथे घडली.

बिंदू अनिल पाटील (वय 37, रा. विकासनगर, देहूरोड) यांनी याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, रेशमा अजीज खान (रा. विकासनगर, देहूरोड) या महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना 2 आणि 3 मे 2019 रोजी घडली आहे. आरोपी रेश्मा या महिलेने फिर्यादी बिंदू यांना एअर इंडिया या कंपनीत नोकरी लावण्याचे आमिष दाखवले. या आमिषापोटी बिंदू यांच्याकडून आरोपी महिलेने 7 लाख 85 हजार रुपये उकळले. पैसे घेऊन बिंदू यांना नोकरी लावली नाही. तसेच बिंदू यांनी पैसे परत मागितले असता आरोपीने पैसे देखील परत दिले नाहीत. याबाबत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.