Air India Airline : एअर इंडियाने दर आठवड्याला २० अतिरिक्त उड्डाण्णांसह अमेरिका आणि इंग्लंड सोबतचे दळणवळण केले आणखी मजबूत

एमपीसी न्यूज : आंतरराष्ट्रीय पातळीवर आपला ठसा आणखी मजबूत करताना भारतातील आघाडीची विमान कंपनी एअर इंडियाने आज बर्मिंगहॅम, लंडन आणि सॅन फ्रान्सिस्कोला दर आठवड्याला २० अतिरिक्त उड्डाण्णांची घोषणा केली. आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक नकाशावर अग्रणी म्हणून आपले स्थान पुन्हा प्राप्त करण्यासाठी एअरलाइनच्या चालू असलेल्या प्रयत्नांचा हा एक भाग आहे. या ३ जागतिक स्थानांसाठीची अतिरिक्त उड्डाणे या वर्षी ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान टप्प्याटप्प्याने सुरू केली जातील.

बर्मिंगहॅमसाठी आठवड्यातून ५ अतिरिक्त उड्डाणे, लंडनसाठी ९ अतिरिक्त उड्डाणे आणि सॅन फ्रान्सिस्कोसाठी आठवड्यातून ६ अतिरिक्त उड्डाणे यांसह एअर इंडिया ग्राहकांना दर आठवड्याला ५,००० पेक्षा जास्त अतिरिक्त जागा देऊ करेल आणि कनेक्टिव्हिटी, सोय आणि केबिन स्पेस यादृष्टीने पुरेसे पर्याय सुनिश्चित करेल.

एअर इंडियाचे यूकेसाठी दर आठवड्याला ३४ फ्लाइटचे सध्याचे वेळापत्रक आता ४८ फ्लाइट्सवर जाईल. दिल्लीहून तीन आणि अमृतसरहून दोन अशी बर्मिंगहॅमला दर आठवड्याला पाच अतिरिक्त उड्डाणे असतील. लंडनला नऊ अतिरिक्त साप्ताहिक उड्डाणे होतील. त्यापैकी पाच मुंबईहून, तीन दिल्लीहून आणि एक अहमदाबादहून आहे. एकूण सात भारतीय शहरांमधून आता यूकेच्या राजधानीसाठी एअर इंडियाची नॉन-स्टॉप उड्डाणे असतील.

भारतातून अमेरिकेला जाणार्‍या फ्लाइट्स दर आठवड्याला ३४ वरून ४० पर्यंत वाढतील. एअर इंडिया आता मुंबईला सॅन फ्रान्सिस्कोशी आठवड्यातून तीन वेळा विमान सेवेसह जोडले जाईल  आणि आठवड्यातून तीन वेळा बंगळुरूहून पुन्हा सेवा सुरू होईल. अशा रीतीने दिल्ली, मुंबई आणि बेंगळुरू येथून एअर इंडियाची सॅन फ्रान्सिस्कोसाठीची नॉन-स्टॉप विमान सेवा आठवड्यातून १० ते १६ वेळेला असणार आहे.

या प्रगतीबद्दल भाष्य करताना एअर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. कॅम्पबेल विल्सन म्हणाले, “विहान.एआय परिवर्तन कार्यक्रमांतर्गत एअर इंडिया स्वतःचाच नव्याने शोध घेत असताना वारंवारता वाढविणे आणि मोठ्या-महत्वाच्या भारतीय शहरांमधून अधिकाधिक आंतरराष्ट्रीय गंतव्यस्थानांपर्यंत कनेक्टिव्हिटी सुधारणे हे एक महत्त्वपूर्ण लक्ष्य आहे. यूएस आणि यूकेसाठी मोठ्या प्रमाणात विमान उड्डाण्णांच्या संख्येत वाढ, तसेच नवीन शहर जोड्या आणि विमानातील सुधारित केबिन इंटीरियरची भर या सगळ्या गोष्टी  टाटा समूहाने एअर इंडियाच्या अधिग्रहणानंतरच्या फक्त १० महिन्यांत होत आहेत. आमच्या उद्दिष्टाचे हे स्पष्ट संकेत आहेत आणि अधिक मोठ्या आकांक्षेच्या दिशेने उचललेले एक प्रारंभिक पाऊल आहे.”

नवीन विमाने भाड्याने देण्याव्यतिरिक्त एअर इंडिया विद्यमान नॅरो-बॉडी आणि वाइड-बॉडी विमाने ऑपरेटिंग फ्लीटमध्ये पुनर्संचयित करण्यासाठी काम करत आहे. वर वर्णन केलेल्या विस्तारापूर्वीच एअरलाइनने आधीच दिल्ली आणि व्हँकुव्हर दरम्यान वारंवारता वाढवली असून  असंख्य देशांतर्गत सेवांची त्यात भर घातली आहे.

अतुलनीय ग्राहक सेवा आणि सोयी सुविधा हे विहान.एआय या एअर इंडियाच्या परिवर्तनीय रोडमॅपच्या ओळखल्या गेलेल्या पाच स्तंभांपैकी एक आहे. विहान.एआय च्या इतर स्तंभांमध्ये मजबूत कामकाज, उद्योग नेतृत्व, व्यावसायिक कार्यक्षमता आणि नफा आणि सर्वोत्तम उद्योग प्रतिभा आकर्षित करणे समाविष्ट आहे.

बर्मिंगहॅम, लंडन आणि सॅन फ्रान्सिस्कोसाठी नवीन फ्लाइट शेड्यूल

मार्ग [vv]सध्याची फ्लाइट संख्यानवीन फ्लाइट संख्यालागू होणार
ATQ-BHX132x Effective 03Oct; 3x Effective 17Nov
DEL-BHX032x Effective 02Oct; 3x Effective 16Nov
DEL-LHR111430-Oct-22
BOM-LHR71230-Oct-22
AMD-LHR3430-Oct-22
BOM-SFO0302-Dec-22
BLR-SFO0315-Dec-22

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.