Airtel Plan Hike : एअरटेलचे व्हाईस, डेटा प्लॅन महागाले, प्रिपेड प्लॅनमध्ये 20 ते 25 टक्क्याने दरवाढ 

एमपीसी न्यूज – भारती एअरटेलने प्रिपेड प्लॅनमध्ये 20 ते 25 टक्क्याने दरवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे एअरटेलचे व्हाईस कॉल, अनलिमिटेड व्हाईस कॉल आणि डेटा प्लॅन महागणार आहेत. यासह एअरटेलचे टॉपअप रिचार्ज देखील महागणार आहेत. 

वाढलेल्या दरामुळे एअरटेल ग्राहकांना झळ बसणार आहे. नवीन दर येत्या 26 नोव्हेंबर पासून लागू होणार असल्याचे एअरटेलने म्हटले आहे. त्यामुळे 26 नोव्हेंबर पासून एअरटेलच्या ग्राहकांना वाढलेल्या दरानुसार रिचार्ज करावे लागतील. इंधनदरवाढीमुळे अगोदरच सर्व सामान्य माणूस पिचला असताना एअरटेलने केलेली दरवाढ ग्राहकांच्या खिशाला कात्री लावणार आहे.

एअरटेलच्या वाढलेल्या दरामुळे 79 रुपयांचा व्हाईस प्लॅन आता 99 रुपयांचा होणार आहे. त्यासाठी 50 रुपये  टॉक टाईम अधिक मिळेल आणि 200 डेटा व 1 पैसा प्रति सेकंद असे व्हाईस टॅरिफ असेल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.