Aishwarya Bachchan: ऐश्वर्या आणि कन्या आराध्या कोरोना पॉझिटीव्ह, जया बच्चन मात्र कोरोना निगेटीव्ह!

Aishwarya Bachchan: Aishwarya and daughter Aradhya corona positive, but Jaya Bachchan corona negative!

एमपीसी न्यूज – भारतीय चित्रपटसृष्टीतील महानायक अमिताभ बच्चन व त्यांचा मुलगा अभिनेता अभिषेक बच्चन यांच्या पाठोपाठ त्यांची सून व आघाडीचे लोकप्रिय अभिनेत्री ऐश्वर्या रॉय बच्चन तसेच नात आराध्या या दोघींच्या कोरोना चाचणीचा अहवाल ‘पॉझिटीव्ह’ आला आहे. पत्नी व माजी खासदार जया बच्चन यांच्या चाचणीचा अहवाल मात्र निगेटीव्ह आला आहे. 

महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ट्वीटद्वारे ही माहिती दिली. ऐश्वर्या आणि आराध्या यांचा कोरोना चाचणी रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्याने बच्चन कुटुंबातील कोरोनाबाधित सदस्यांची संख्या आता चार झाली आहे.

ऐश्वर्या आणि आराध्या यांचे कोरोना चाचणी रिपोर्ट निगेटीव्ह असल्याच्या सकाळपर्यंत सांगण्यात येत होते. तथापि, स्वतः आरोग्यमंत्री टोपे यांनीच त्या दोघींचे रिपोर्ट पॉझिटीव्ह असल्याच्या माहितीस दुजोरा दिला आहे. त्यामुळे बच्चन कुटुंबीयांच्या चिंतेत आणखी भर पडली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.