Aishwarya got discharge: अखेर ऐश्वर्या व आराध्याला नानावटीमधून मिळाला डिस्चार्ज

Aishwarya Rai Bachchan Tests Negative For COVID-19, Discharged From Hospital बिग बी व अभिषेक यांना ११ जुलै रोजी कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यावर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

एमपीसी न्यूज – मागील एक आठवड्यापासून नानावटी रुग्णालयात भरती असलेल्या अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन व तिची आठ वर्षांची मुलगी आराध्या यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे या दोघींना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला असून अभिषेक बच्चनने ट्विटरवर याविषयीची मााहिती दिली. त्याचसोबत त्याने ट्विटरवर चाहत्यांचे आभार मानले.

‘तुम्ही सातत्याने करत असलेल्या प्रार्थनांसाठी तुमचे खूप खूप आभार. मी तुमचा कायम ऋणी आहे. ऐश्वर्या आणि आराध्या यांचा रिपोर्ट सुदैवाने निगेटिव्ह आला असून त्यांचा रुग्णालयातून डिस्चार्ज मिळत आहे. ते आता घरी राहतील. मी आणि बाबा अजूनही रुग्णालयातच राहणार आहोत’, असं ट्विट अभिषेकने केलं.

_MPC_DIR_MPU_II


बच्चन कुटुंबीयांपैकी अमिताभ आणि अभिषेक यांना सर्वप्रथम कोरोनाची लागण झाल्यामुळे नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी ऐश्वर्या व आराध्याला घरातच क्वारंटाइन करण्यात आलं होतं. मात्र एका आठवड्यानंतर दोघींनाही नानावटीमध्ये दाखल करण्यात आलं.

अमिताभ बच्चन व अभिषेक यांच्यावर नानावटीमध्ये अजूनही उपचार सुरु आहेत. बिग बी व अभिषेक यांना ११ जुलै रोजी कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यावर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. १२ जुलै रोजी ऐश्वर्या व आराध्याचा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.