Ajay Devgn to make film on Galwan fight : गलवान खो-यात झालेल्या चकमकीतील भारतीय जवानांची शौर्यगाथा येणार पडद्यावर

The story of the bravery of the Indian soldiers in the encounter in Galwan valley will come to the screen. या चित्रपटात चीनच्या लष्कराच्या सामना केलेल्या त्या २० जवानांची शौर्यगाथा दाखवली जाणार आहे.

एमपीसी न्यूज – काही दिवसांपूर्वी लडाखमधील गलवान खोऱ्यात भारत आणि चीनच्या जवानांमध्ये चकमक झाली होती. या चकमकीत भारतीय जवानांनी चीनच्या ४० जवानांना ठार केलं होतं. तसंच यादरम्यान २० भारतीय जवानांना हौतात्म्य आलं होतं. तर काही जवान जखमीही झाले होते. आता गलवान खोऱ्यातील भारतीय जवानांची शौर्यगाथा मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. फिल्म क्रिटीक आणि ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे.

‘अजय देवगण गलवान खोऱ्यात झालेल्या चकमकीवर चित्रपट तयार करणार आहे. सध्या या चित्रपटाचं नाव ठरवण्यात आलं नाही. या चित्रपटात चीनच्या लष्कराच्या सामना केलेल्या त्या २० जवानांची शौर्यगाथा दाखवली जाणार आहे. या चित्रपटाची स्टारकास्टही अजून अंतिम करण्यात आलेली नाही’,  असं ट्विट तरण आदर्श यांनी केलं आहे.

अजय देवगण एएफ फिल्म्स आणि सिलेक्ट मीडिया होल्डिंग्स एलएलपी हे या चित्रपटाचे निर्माते असणार आहेत. या आधी अजयने मराठा सेनानी तानाजी मालुसरे यांची शौर्यगाथा पडद्यावर आणली होती. त्याने बनवलेल्या ‘तान्हाजी – द अनसंग वॉरियर’ या चित्रपटाने प्रचंड यश मिळवले होते. भारतीय इतिहासातील अशाच काही दुर्लक्षित हिरोंची कहाणी अजय मोठ्या पडद्यावर आणणार आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.