मंगळवार, डिसेंबर 6, 2022

Ajit foundation : वंचित मुलींच्या रूपातील नवदुर्गांना घेतले दत्तक!

अजित फाऊंडेशन व सृजनालयाचा सामाजिक उपक्रम

एमपीसी न्यूज : अन्न, वस्त्र, निवारा इतकच शिक्षण सुद्धा मूलभूत गरज असून मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षण प्रवाहात येणं व शिक्षण घेणं खूप आवश्यक असते. (Ajit foundation) त्यामुळेच अजित फाउंडेशन व सृजनालयाचा वतीने लाचकन वस्तीतील नऊ मुलींना दत्तक घेण्यात आले असून त्यांच्या संपुर्ण शिक्षणाचा खर्च या संस्थेमार्फत केला जाणार आहे.

स्थलांतरित व भटक्या समाजातील पालकांची परिस्थिती भयंकर असते.पोटासाठी बिऱ्हाड पाठीवर घेऊन गावकुसाबाहेर किंवा उड्डाण पुलाखाली वास्तव्यस असलेल्या स्थलांतरित कुटुंबात मुलींबाबत शिक्षणाबाबतची अनास्था असते, लैगिंक शोषणाच्या भीतीपोटी बालविवाह, कमी वयातलं मातृत्व यांसह असंख्य समस्या मुलींना भोगाव्या लागतात. अर्थाजनाचे साधन म्हणून या मुली सिग्नलवर भीक मागणे, कचरा वेचणे, गजरे विकायचे, छोट्या बहिणींचा सांभाळ करायची कामं करतात.

स्थलांतरित कुटुंबात मुलींच्या शिक्षणाबाबत अनास्था असते, लैगिंक शोषणाच्या भीतीपोटी बालविवाह, कमी वयातलं मातृत्व यांसह असंख्य समस्या मुलींना भोगाव्या लागतात.(Ajit foundation) अशा मुली कायम दुर्लक्षित व उपेक्षित असतात. मुलींना बालवयातच शिक्षणाची संधी मिळावी. याच दृष्टिकोनातून वंचित राहिलेल्या या नवदुर्गाचं शिक्षण व्हावे, म्हणून लाचकन वस्तीतील नऊ मुलींचा सर्व शैक्षणिक खर्च उचलत या नवदुर्गांना अजित फाउंडेशनच्या विनया निंबाळकर यांनी शैक्षणिक दत्तक घेतले. याप्रसंगी महेश निंबाळकर, गिरीष तापकीर, रेश्मा मंगोडे, प्राजक्ता मुऱ्हे व वस्तीतील पालक मोठ्या संख्येने उपस्थित होती.

Pune mahavitaran : महावितरणच्या पुणे प्रादेशिक विभागाने एकाच दिवसात पकडल्या 1501 वीज चोऱ्या

“गरिबांच्या, वंचितांच्या मुलींनीही दर्जेदार शिक्षण मिळावे, त्या उच्च शिक्षित व्हाव्यात. कुटुंबाला स्थिर करत असताना त्यांनी शिक्षणातून समाज विकास व देश सेवा करावी, या हेतूने हा उपक्रम राबविला आहे.(Ajit foundation) समाजातील दात्यांनी अशा उपक्रमास सर्वाथाने पाठबळ द्यायला हवा.” असं मत विनया निंबाळकर, सचिव अजित फाऊंडेशन यांनी व्यक्त केलं.

तळेगाव-दाभाडे स्टेशन भागात रहिवासी असलेली झारी सोनार, कोल्हाटी व डवरी गोसावी समाजातील लाचकन वस्तीत 53 अधिक मुलांसाठी अजित फाऊंडेशनने आफ्टर स्कुल प्रोग्रॅम अंर्तगत ‘ग्रीन सिग्नल शाळा’ हा उपक्रम सुरु केला. सुरुवातीला मुलांचा बेस लाईन सर्वे करून गट पद्धतीने अभ्यासात मागे असलेली, (Ajit foundation) पुस्तकातील संकल्पना स्पष्ट न झालेली व अंक-अक्षर ओळख नसलेली मुले शोधून बेसलाईन सर्व्हेतून मुलांचे गट बनवले आहेत. अशा मुलांसाठी ‘ग्रीन सिग्नल शाळा’ शैक्षणिक उपक्रम कार्यान्वित केला.

 

Latest news
Related news