Ajit Pawar Birthday : व्ही.जे.एन.टी. सेलच्या वतीने पालिकेच्या शाळेत वृक्षारोपण

एमपीसी न्यूज –  विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar Birthday) यांच्या वाढदिवसानिमित्त व्ही.जे.एन.टी.सेलच्या वतीन मोहननगर येथील पालिकेच्या शाळेत वृक्षरोपण करण्यात आले आहे. तसेच ज्या मुलांचे पालकत्व घेण्यात आले आहे, त्यातील गुणवंत मुलांचा सत्कारही यावेळी करण्यात आला आहे.

यावेळी परिसरातील ज्येष्ठ नागरिक संजय सस्ते, मुख्याध्यापिका कल्पना राऊत, मुख्याध्यापक रविंद्र शिंदे, शहराध्यक्षा कविता आल्हाट, दादा साहेब माने, सेलचे अध्यक्ष धीरज तामचीकर, कार्याध्यक्ष गुलामअली भालदार, ज्योती निंबाळकर, सुरेखा झिंटे, ज्योती गोफणे, सविता लगस, तृतीयपंथी सेलचे अध्यक्ष किरण वाघ, स्वप्नील डोलरे, आयुष चांदणे, नरेश भंडारे, रुपेश वल्लीक, शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.

Talawade : कंपनीचे शटर उचकटून दोन लाखांचे साहित्य पळवले

पिंपरी चिंचवड भटक्या विमुक्त जाती-जमाती सेलच्या अध्यक्षा निर्मला माने यांच्या नेतृत्वाखाली मोहननगर येथील पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेच्या प्रागणांत वृक्षारोपण व स्थानिक रहिवासियांना वृक्ष वाटप करण्यात आले. या कार्यक्रमात या परिसरातील गुणवंत विद्यार्थीनी कविता काळे हिचे पालकत्व सेलच्या अध्यक्षा निर्मला माने यांनी स्विकारला पक्षाच्या शहराध्यक्षा कविता आल्हाट यांच्याहस्ते धनादेश (Ajit Pawar Birthday) देण्यात आला. तसेच, परिसरातील नागरिकांना आपल्या प्रांगणात लावण्यासाठी वृक्षभेट विविध मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.

youtube.com/watch?v=pMmzXaYDFto

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.