Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लागण

एमपीसी न्यूज : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून हि माहिती दिली आहे. पवारांनी शुक्रवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याच्या अवघ्या काही दिवसांतच हा प्रकार घडला आहे. ठाकरे यांची बुधवारी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती.

Sachin Ahir : शिवसेनेच्या बंडखोरांनी स्वगृही परतण्याची दारे स्वत:च बंद केली

त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे, कि ”काल मी कोरोनाची चाचणी केली; ती पॉझिटिव्ह आली आहे. माझी प्रकृती चांगली असून मी डॉक्टरांचा सल्ला घेत आहे. आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं कोरोनाला हरवून लवकरच मी आपल्या सेवेत रुजू होईन. माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी आणि लक्षणं दिसल्यास तत्काळ आपली कोरोना चाचणी (Ajit Pawar) करून घ्यावी.”

नुकतेच महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे देखील कोरोनामुक्त झाले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.