Pune News : राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या या कृतीमुळे अजित पवार यांना व्यक्त करावी लागली दिलगिरी

एमपीसी न्यूज : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नुतन कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमात कोरोना नियमाचा फज्जा उडवत मोठ्या प्रमाणात गर्दी करण्यात आली होती.  याबाबत बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलगिरी व्यक्त केली.

पावर म्हणले , राष्ट्रवादी काँग्रेसच्या नुतन कार्यालयाचे उद्घाटनाचा कार्यक्रम कोरोना संबंधीच्या नियमांचे पालन करून करण्याच्या सूचना दिल्या होत्या. आम्ही राज्यातील जनतेला नियम पाळायला सांगतो, म्हंटल्यावर आम्हीही ते नियम पाळणे गरजेचे आहे. मात्र राष्ट्रवादीच्या प्रेमापोटी झालेल्या गर्दीमुळे या ठिकाणी नियमांचे पालन झाले नाही, ही मनात खंत आहे. याबद्दल आपण पवार यांनी दिलगीरी व्यक्त केली.

शिवाजीनगर येथील डेंगळे पुलाजवळील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे चौकात साकारलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन सोमवारी अजित पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर खा. वंदना चव्हाण, महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, शहराध्यक्ष प्रशांत जगताप, पिंपरी चिंचवडचे अध्यक्ष संजीव वाघिरे, पालिकेतील विरोधीपक्षनेत्या दिपाली धुमाळ, प्रवक्ते अंकुश काकडे यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

अजित पवार  पुढे म्हणाले, संघटना हि कार्यकर्त्यांच्या बळावर असते, त्यामुळे सर्व जाती धर्माच्या कार्यकर्त्यांना संधी मिळाली पाहिजे. पवार साहेबांनी आपल्या राजकीय जीवनात शाहु फुले आंबेडकरांच्या विचाराला अनुसरून तळागाळातल्या कार्यकर्त्यांना ताकद आणि पदे देवून मोठे केले. अनेक कार्यकर्ते चांगले काम करत असतानाही त्यांना संधी देता आली नाही. त्यामुळे भविष्यात अशा लोकांना संधी देण्याचा प्रयत्न राहील.

खरे तर या कार्यालयाचे उद्घाटन पवार साहेबांच्या हस्ते करण्याची माझी इच्छा होती. मात्र, सध्याच्या परिस्थीतीमुळे शक्य झाले नाही. हे कार्यालय पुण्याच्या राजकीय, सामाजीक, सांस्कृतिक व राजकीय विकासाला गती देणारे ठरेल. या कार्यालयात येणाऱ्या प्रत्येका सन्मान राखला जाईल, याची काळजी घेणे गरजेचे आहे. कोणत्याही पद्धतीने गटा-तटाचे राजकारण वाद मतभेद होता कामा नये. साहेबांना साथ देणाऱ्यांना सन्मानाची व आदराची वागणुक मिळणे गरजेचे आहे. पक्षाच्या नेतृत्त्वाला पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना कमीपणा येईल असे, वर्तन कोणाचेही होता कामा नये. इथे येणाऱ्या प्रत्येकाचे काम होईलच असे नाही. ज्यांचे काम होणार असेल त्यांना सांग आणि ज्यांचे होणारे काम नसेल तर त्यांना नाराज न करता समजुन सांगणे गरजेचे आहे. महात्वाच्या बैठकांना सर्वांना बोलावणे गरजेचे आहे. नागरिकांची कामे सोडवण्यासाठी या कार्यालयात माझा स्वीय सहाय्यक आठवड्यातून दोन दिवस उपस्थित राहिल, असेही पवार म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.