Ajit Pawar janta darbar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज जनता दरबार

एमपीसी न्यूज : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज जनता दरबार होणार आहे. सर्व मंत्र्यांमध्ये अजित पवार यांचा जनता दरबार सर्वाधिक लोकप्रिय आहे. राज्यातील नागरिक मोठ्या संख्येनं अजित पवार यांच्याकडे आपल्या समस्या घेऊन येतात.

अजित पवार नागरिकांच्या या समस्या ऐकून त्यांची कामं तातडीने मार्गी लावण्यावर अजित पवारांचा भर असतो. त्यामुळे अजितदादांकडे येणाऱ्या लोकांची संख्याही मोठी असते.

अजित पवार यांची बोलण्याची जशी एक स्टाईल आहे. तशी ती कामाच्या पद्धतीमध्येही पाहायला मिळते. लोकांनी मांडलेले प्रश्न समजून घेत, त्यांच्या स्टाईलने ते अधिकाऱ्यांना फोन करुन लोकांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे अन्य मंत्र्यांचे जनता दरबार साधारण 2 तास चालत असले, तरी अजितदादांचा जनता दरबार मात्र 4 तास चालतो.

अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे अन्य मंत्रीही जनता दरबार घेतात. त्यात सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, अदिती तटकरे अशा अनेक मंत्र्यांचा समावेश आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.