Mumbai : राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधीमंडळ पक्षनेतेपदावरून अजित पवार यांची हकालपट्टी

जयंत पाटील नवे गटनेते

एमपीसी न्यूज – भाजपसोबत घरोबा करत उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतलेल्या अजित पवार यांची राष्ट्रवादीच्या विधीमंडळ गटनेतेपदावरुन हकालपट्टी केली आहे. त्यांचे व्हीप, पक्षनेत्याचे सर्व अधिकार काढले आहेत. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची गटनेतेपदी निवड केली आहे.

राष्ट्रवादीचे विधीमंडळ गटनेते असलेल्या अजित पवार यांनी बंडखोरी करत आज (शनिवारी) भल्या पहाटे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. परंतु, पवार यांनी भाजपसोबत सरकारमध्ये सहभागी होण्याची भूमिका पक्षाच्या ध्येय-धोरणाशी सुसंगत नाही. पक्षाला मान्य नाही. त्यामुळे त्यांची निवड रद्द करण्यात येत आहे.

गटनेता म्हणून अजित पवार यांचे व्हीप काढण्याचे आणि पक्षनेता म्हणून असलेले सर्व अधिकार रद्द केले आहेत. दरम्यानच्या काळात विधीमंडळ पक्षनेतापदाचे अधिकार जयंत पाटील यांना देण्यात आले आहेत.

अजित पवार यांच्यावर पुढील निर्णय घेण्याचे अंतिम अधिकार शरद पवार, जयंत पाटील यांना देण्यात आले आहेत. त्याबाबतचा ठराव आमदारांच्या बैठकीत करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.