Ajit Pawar Statement : निलेश राणेंच्या डोक्यावर परिणाम झालाय : अजित पवार

एमपीसी न्यूज : राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या बलात्काराच्या आरोपावरुन विरोधी पक्षांकडून सरकारला अडचणीत आणून राष्ट्रवादी काँग्रेसला घेरण्याचे प्रयत्न सुरु आहे. दरम्यान भाजपचे आमदार निलेश राणे यांनी इतके गुन्हेगार मिळून एका जेलमध्ये नसतील तितके एका पक्षात आहेत, अशी टीका केली.

त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, ‘ते काहीही बोलतात आणि त्यावर मी बोलायाचे का? पण एक सांगतो त्या निलेश राणेच्या डोक्यावर परिणाम झालाय,’ अशा शब्दात खरपूस समाचार घेतला.

पुणे विधानभवन (कौन्सिल हॉल) येथे आढावा बैठकीसाठी आले होते. यावेळी प्रसारमाध्यमांशी चालता चालता उपमुख्यमंत्री पवार यांनी या प्रश्नावर उत्तर दिले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.