Ajit Pawar : मुख्यमंत्री फिरताना रात्री उशिराही स्पीकर चालूच असतो!

एमपीसी न्यूज : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होते. वेगवेगळ्या शहराचा दौरा त्यांनी केला. याच दौऱ्यावरून विरोधी पक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी आता त्यांना टोला लगावला आहे. आम्ही जेव्हा पदावर असतो तेव्हा आम्ही नियम म्हणून चालत नाही. नियमाने रात्री दहाच्या पुढे लाऊड स्पीकर बंद ठेवणे आवश्यक आहे. मात्र, मुख्यमंत्री फिरत असताना रात्री उशिरापर्यंत स्पीकर चालूच असतो. नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश देणारे अधिकारीच जर नियम मोडत असतील तर कसे चालेल. अशा शब्दात त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उशिरा चालणाऱ्या दौऱ्यावरून टोला लगावला.

अजित पवार (Ajit Pawar) शुक्रवारी बारामती तालुक्यातील सायबाची वाडी येथील शेतकरी मेळाव्यात बोलत होते. पुढे बोलताना, ते म्हणाले संविधानाने सांगितल्याप्रमाणे पालन करणे गरजेचे आहे. मग तो सामान्य व्यक्ती असो किंवा कोणी उच्चपदस्थ व्यक्ती असो. प्रत्येकाने नियमाचे पालन करणे गरजेचे आहे. पुढे बोलताना ते म्हणाले, कि राज्यात सध्या दोघेच कारभार करीत आहेत. राज्यातील अनेक विकास कामे ठप्प झाली आहेत. या दोघांवर इतका भार आला, की मुख्यमंत्री आजारी पडायला लागले. वेळेत मंत्रिमंडळाचा विस्तार केला असता तर कामाची वाटणी झाली असती. आणि संबंधित खात्याचे मंत्री आपापल्या भागात काम करत राहिले असते.

Vasant More : कितीही तोडा-जोडा, महापौर मात्र मनसेचाच!

सर्वोच्च न्यायालयाचा निकाल काय लागेल हे माहीत नसल्याने मंत्रिमंडळ रखडला की काय अशी शंका येत असल्याचे त्यांनी सांगितले. बंडखोरी करणाऱ्या आमदारांना मंत्रिपदाचे आमिष दिला असावा, त्यामुळे देखील विस्तार होत नसेल. कोणाला मंत्री करावं? हा देखील प्रश्न पडला असेल. भाजपच्या 106 आमदारांना वाटते, की आपल्यालाही मंत्रीपद मिळावं. परंतु, त्यांच्याकडे मुख्यमंत्री पद नसल्यामुळे त्यांच्या आमदारांचे चेहरे इतके पडले, की न सांगितलेलं बरं असा टोला त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना देखील लगावला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.