Mumbai : देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर अजित पवार यांनी घेतलं गणरायाचं दर्शन; भेटीबाबत पुण्याचे पालकमंत्री बदलण्याच्या चर्चांना उधाण

एमपीसी न्यूज – राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या शासकीय निवासस्थानी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भेट देऊन गणरायाचे दर्शन घेतले. सर्वांना सर्वांना सुखी ठेव, अशी प्रार्थना अजित पवार यांनी केली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचं स्वागत केलं.या भेटीच्या निमित्ताने पुण्याचे पालकमंत्री बदलण्याच्या चर्चांना उधाण आल्याचे दिसते.
Pimpri : एचए स्कूलच्या दोन खेळाडूंना थाई बॉक्सिंगमध्ये सुवर्ण पदक
जुलै महिन्यामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी काही आमदारांसोबत सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतलेल्या पवारांना अर्थ खात्यांसह पुण्याचे पालकमंत्री पद मिळेल, असे बोलले जात होते. त्याबाबत ब–याच चर्चा देखील झाल्या. अद्यापही त्यांना पुण्याचे पालकमंत्री पद मिळालेले नाही.
मात्र आज झालेल्या भेटीतून पुण्याचे पालकमंत्री बदलले जातील अशा चर्चांना सर्वत्र उधाण आल्याचे दिसते. सद्यस्थितीत पुण्याचे पालकमंत्री उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आहेत.