Pune News : कोरोना प्रादुर्भावावर वेळीच नियंत्रण आणण्यासाठी अजित पवारांनी घेतला हा निर्णय

एमपीसी न्यूज : शहर, जिल्हा आणि आसपासच्या भागातील कोरोनाचे रुग्ण वाढत चालले आहेत. (Coronavirus in Pune) त्या पार्श्वभूमीवर प्रादुर्भाव रोखण्यासाठी कडक उपाययोजना करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या. ज्या भागात रुग्ण अधिक वाढत आहेत, अशा ‘हॉटस्पॉट’ प्रभावी नियोजन करून आवश्यकता भासल्यास पुन्हा प्रतिबंधित क्षेत्रे (Containment Zone) निर्माण करावेत अशा सूचना पवार यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना केल्या. 

पुणे जिल्ह्यातील दैनंदिन कोरोना रूग्णवाढीचा आकडा शनिवारी पुन्हा हजारावर गेल्याने चिंतेचं वातावरण आहे. अशात सकाळी नऊ वाजता घेण्यात आलेल्या बैठकीत पुणे शहर आणि जिल्ह्यातील वाढत्या कोरोना प्रादुर्भावावर वेळीच नियंत्रण आणण्यासाठी कठोर निर्बंध घालण्याचा निर्णय घेण्यात आला.

_MPC_DIR_MPU_II

कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोरोना हॉटस्पॉट असलेल्या आणि प्रतिबंधित क्षेत्र (Containment Zone) असलेल्या भागात प्रभावीपणे उपाययोजना आणि अंमलबजावणी करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत गृहभेटीद्वारे सुपर स्प्रेडर व ILI /SARI रुग्णांचे सर्वेक्षण तसंच खासगी वैद्यकीय व्यावसायिक यांच्याकडे येणाऱ्या Flu सदृश्य रुग्णांची RTPCR तपासणी करणे बंधनकारक करण्याचं यावेळी सांगण्यात आलं.

यासोबतच संपर्क शोध मोहीम (Contact Tracing) अधिक प्रभावीपणे राबविण्याचं धोरण यावेळी ठरवण्यात आलं. सोबतच नागरिकांना सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी केलं. शनिवारी दिवसभरात पुण्यात 414 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 247 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. शनिवारी 6 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यातील एक रुग्ण पुण्याबाहेरील आहे. तर, 160 जणांची प्रकृचती गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

You might also like