Pune News : मला तेवढाच उद्योग नाही, राज्यातील अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या माझ्याकडे आहेत – अजित पवार 

पार्थच्या ट्विटवर अजित पवार यांची रोखठोक भूमिका

एमपीसी न्यूज – अलीकडची मुलं काहीही ट्विट करतात. प्रत्येक वेळी तुमच्या मुलाने हे ट्विट केले, असे विचारले जाते, मला तेवढाच उद्योग नाही, राज्यातील अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या माझ्याकडे आहेत, अशा शब्दांत रोखठोक भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी पुण्यात पत्रकारांशी बोलताना मांडली.

पार्थ पवार यांनी केलेल्या ट्विटबाबत पत्रकारांनी आज अजित पवार यांना विचारणा केली. त्यावेळी पवार यांनीही आपल्या नेहमीच्या स्वभावानुसार बिनधास्तपणे उत्तर देऊन टाकले.

यापूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही पार्थ पवार यांच्या मताला कवडीची किंमत नसल्याचे ठणकावून सांगितले होते. पार्थ पवार यांनी मराठा आरक्षणासाठी सुप्रीम कोर्टात जाण्याचा इशारा दिला आहे. प्रत्येकाला काय ट्विट करावे, याचा अधिकार असतो, ही राष्ट्रवादीची भूमिका नसल्याचेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.

माझी बहिण खासदार सुप्रिया सुळेंनी स्पष्टपणे सांगितले आहे की, मराठा आरक्षण असेल, धनगर आरक्षण किंवा इतर घटकांचं आरक्षण असेल ज्याला त्याला आपल्या हक्काचं आरक्षण मिळालं पाहिजे, अशी आमची भूमिका आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.